पाणीसाठा चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:46 PM2018-10-15T22:46:38+5:302018-10-15T22:47:27+5:30
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून नावारूपास आलेल्या वरूड तालुक्यात जुलै महिन्यापासून नदी-नाले कोरडेच असल्याने आणि सिंचन प्रकल्पात आवश्यक जलसाठा संचयित झाला नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. वरूड तालुक्यातील प्रकल्प आचके देत असून, तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून नावारूपास आलेल्या वरूड तालुक्यात जुलै महिन्यापासून नदी-नाले कोरडेच असल्याने आणि सिंचन प्रकल्पात आवश्यक जलसाठा संचयित झाला नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. वरूड तालुक्यातील प्रकल्प आचके देत असून, तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
तालुक्यात नऊ प्रकल्प असून, यावर्षी पावसाळ्यात सरासरी ४० टक्केच जलसाठा संचयित झाला. एकेकाळी जानेवारीपर्यंत वाहत्या राहणाऱ्या नदीला एकही पूर गेला नाही. आॅक्टोबर महिन्यात नऊ सिंचन प्रकल्पांपैकी जामगाव प्रकल्पात ७८.८४ व वाईमध्ये ६८.२५ टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये ५० टक्क््यांपेक्षा कमी जलसाठा असल्याने शेतकºयांना परतीच्या पावसाची अपेक्षा होती. परंतु, त्याचा मागमूसही नसल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.
शेकदरी प्रकल्पात १० आॅक्टोबरपर्यंत १९.८९ टक्के, पुसली प्रकल्पामध्ये १७.२४ टक्के, सातनूर प्रकल्पामध्ये ३०.४१ टक्के, पंढरी प्रकल्पामध्ये ५७.४४ टक्के, नागठाणा प्रकल्पामध्ये ४५.३१ टक्के जलसाठा आहे, तर जमालपूर व बेलसावंगी प्रकल्प कोरडे पडले आहेत. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली असून, यापैकी २१ हजार हेक्टर जमिनीवर फळधारणा करणारी संत्राझाडे आहे. रब्बी हंगामातील गहू, चणा तसेच संत्रा आणि कपाशी, मिरची आदी बागायती पिके घेण्यात येतात. परंतु, पाणीपुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाला असून, विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. ओलितामुळे भूजलपातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. भूगर्भातील जिरणाºया पाण्यापेक्षा उपसा अधिक प्रमाणात होत असल्याने समतोल होत नाही. पर्यायाने अतिशोषित म्हणून हा भाग वगळण्यात भूजल सर्वेक्षण विभागाला अडचण येत असल्याने जलव्यवस्थापन ही काळाची गरज झाली आहे. जलव्यवस्थापन झाले ेनाही, तर येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये १०० टक्के जलसंचय झाला होता.
पाऊस २२७.९० मिमी कमी
तालुक्यात १० आॅक्टोबरपर्यंत केवळ ५४० मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी हीच नोंद ७६७.९० मिमी होती. यामुळे यावर्षी २२७.९० मिमी पाऊस कमी झाला. यामुळे तालुक्यावर जलसंकटाचे ढग तयार झाले आहेत. सातत्याने अस्मानी संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्याने पुन्हा कर्जबाजारी होण्याकडे वाटचाल असल्याचे सुतोवाच आहे.
वरूड तालुका ड्रायझोनमुक्त करा
अतिशोषित भूभाग घोषित झाल्याने तालुक्यात नवीन विहिरी आणि बोअर करण्यावर बंदी आहे. यामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर्षीसुद्धा प्रकल्प जलसंचयित झाले नाही, तर विहिरींची पातळीसुद्धा वाढलेली नाही. संत्र्यासह सिंचनाकरिता पाणी मिळविण्याकरिता यावर्षी तरी बोअर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
अतिविकसित क्षेत्र असल्याने उपसा मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाचे पडणारे, भूगर्भात जिरणारे आणि उपसा होणारे पाणी यात समतोलाकरिता रेनवाटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण कार्यक्रम तसेच पाणी अडवा पाणी जिरवा अभियान राबविणे गरजेचे आहे.
- डी.एम. सोनारे
शाखा अभियंता