पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:33 AM2018-04-26T01:33:29+5:302018-04-26T01:33:29+5:30
पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणी स्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा केलेल्या उपाययोजनांचा जि.प. अध्यक्षांनी बुधवारी आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणी स्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा केलेल्या उपाययोजनांचा जि.प. अध्यक्षांनी बुधवारी आढावा घेतला.
जिल्ह्यात पाण्याचे टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५४ गावांतील ६५ खासगी विहीर अधिग्रहित केल्या आहेत. यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचा सामना काही गावांमध्ये करावा लागत आहे. ग्रामीण भागातील भूजल स्तर खोल गेल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहेत. गावातील पाणीपुरवठ्याचे स्त्रोत आटल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प असल्याचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी सांगितले. ग्रामस्थांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये मेळघाटातील दोन गावांचा समावेश आहे. पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध असल्याने टंचाईची तीव्रता कमी-अधिक आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार उपाययोजना सुरू केल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी अधिग्रहित करून आवश्यक तेथे उपाययोजना करण्याचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी अधिकाºयांना दिले आहेत. बैठकीला उपअभियंता संदीप देशमुख, अनूप खासबागे, दीपक डोंगरे, आर.डी सावळकर, दिपेंद्र कोराटे, जी.आर पाटणे आदी उपस्थित होते.