२०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:49+5:30

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत यावर चर्चा करण्यात आली आहे. गावातील नमुना ८ वरील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडी-वस्तीवरील घरांचाही विचार, कृती आराखडा करावा लागणार आहे. या लोकांना पाणीपुरवठा कसे द्यायचा, गावाच्या आजूूबाजूला पाण्याचे स्रोत कोणते, पाइप लाइन कुठून व कशी आणता येईल आदी मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे.

Water supply to every household by 2024 | २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा

२०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण भागात जलजीवन मिशन : गाव कृती आराखडा; वाडी-वस्त्यांचाही होणार विचार

जितेंद्र दखने।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छता अभियानाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मोहीम मिशन महाविकास आघाडी सरकारने हाती घेतली आहे. त्यासाठी जलजीवन मिशन राबवण्यात येणार असून, पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाचे पाणी मिळेल, या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना राबविली जाते. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्ण राहतात. बरेचदा पाणीपुरवठ्याचे स्रोत आटतात. उन्हाळ्यात गावांची तहान भागवण्यासाठी टँकर सुरू करावे लागतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामसेवक, सरपंचांनी कृती आराखडा तयार करावयाचा आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत यावर चर्चा करण्यात आली आहे.
गावातील नमुना ८ वरील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडी-वस्तीवरील घरांचाही विचार, कृती आराखडा करावा लागणार आहे. या लोकांना पाणीपुरवठा कसे द्यायचा, गावाच्या आजूूबाजूला पाण्याचे स्रोत कोणते, पाइप लाइन कुठून व कशी आणता येईल आदी मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय ज्या गावांमध्ये योजना असतील; परंतु त्या अपुºया पडत असतील, अशा गावांमध्ये मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आधारित कृती आराखडा तयार करावा लागेल.
जुन्या योजनेत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. आता दरडोई ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने हा आराखडा तयार करावा लागणार आहे. तसेच हा आराखडा तयार करताना गावातील पशुधनाची संख्या, त्यांना लागणारे पाणी यांचा विचार करावा लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.

अधिकाऱ्यांना मिळाले प्रशिक्षण
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, मुख्य कार्यकारी ते वरिष्ठ स्तरावरील अधिकाºयांपर्यंत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे कार्यशाळा पार पडली. यामध्ये केंद्रीय सचिवांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून केले जात असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.

Web Title: Water supply to every household by 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी