सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:06 PM2017-09-06T23:06:09+5:302017-09-06T23:06:42+5:30

यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे मोर्शीनजीकच्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला होणाºया ....

Water supply from Monday to the next one day | सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देमहापालिका आयुक्त : मजीप्राचा पाणी कपातीचा प्रस्ताव मान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे मोर्शीनजीकच्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला होणाºया पाणी पुरवठ्यावरही गंभीर परिणाम होत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे सोमवार ११ सप्टेंबरपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महापालिकेत यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. याबैठकीत पाणी पुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा झाली. त्यानंतर पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरावती शहराला सिंभोरा येथील अप्परवर्धा धरणातून दररोज ११५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. ९५ दशलक्ष लीटर जलशुद्धीकरणाची क्षमता असतानाही शहरावासियांना १२५ दशलक्ष लीटर्सच्या जवळपास पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा ताण वाढला आहे. त्यातच उंचावरील भागात राहणाºया नागरिकांना पुसेसा पाणी पुरवठा होत नसल्याची ओरडही सुरूच असते.
काही भागातील नागरिकांना तर रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत धरणाची पातळी ३३९.४२ मीटर असून धरणात ५७ टक्केच पाणीसाठा आहे. पावसाळ्यात धरणातील जलसाठा ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचतो. मात्र, त्यातुलनेत यंदा मोठी तफावत दिसत आहे.

मजिप्राक डून प्राप्त पाणीकपातीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून सोमवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. १७ झोनमध्ये पाणी पुरवठ्याचे शेड्युल तयार झाले आहे.
-हेमंत पवार, आयुक्त, महापालिका

यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणीकपात करणे आवश्यक आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक महापालिकेला दिले असून त्यावर ते लवकरच निर्णय देणार आहेत.
-सुरेंद्र कोपुलवार,
कार्यकारी अभियंता, मजीप्रा.

Web Title: Water supply from Monday to the next one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.