आसऱ्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Published: April 28, 2017 12:18 AM2017-04-28T00:18:36+5:302017-04-28T00:18:36+5:30

आसरा येथे जिवन प्राधिकरणद्वारा पाणीपुरवठा केला जातो. परंतु एक दिवसआड पाणी पुरवठा करून पुरेशे पाणी नागरिकांना मिळत नाही.

Water supply one day a day | आसऱ्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा

आसऱ्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा

Next

नागरिकांची भटकंती : आरोग्य धोक्यात
आसरा : आसरा येथे जिवन प्राधिकरणद्वारा पाणीपुरवठा केला जातो. परंतु एक दिवसआड पाणी पुरवठा करून पुरेशे पाणी नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे घरी नळ कनेक्शन असूनही पाणी मिळत नाही. नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. काही-काही नळांमधून येणारे पाणी अतितीव्र दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे. याबद्दल पाणी सोडणाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणाऱ्या पाण्याची तपासणी करून दुर्गंधीयुक्त पाणी कोठून येत आहे याचा शोध घेऊन आम्हाला पाणी सुरळीत व पिण्यायोग्य देण्यात यावे ही मागणी जोर धरत आहे.
आसरा गावामध्ये नळाला मोटारीद्वारे सर्रास पाणी ओढले जात आहे त्यामुळे मोटारीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे नळाला मोटार लावून त्यामधून पाणी न येता हवाच घेत आहे. परंतु मजीप्रा. यांनी त्यांच्या बिलावर नमूद केले आहे कि जर कोणी नळाला मोटार लावून पाणी भरल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु आसरा गावात याच्या उलटच आहे. नळाला मोटारी लावल्याशिवाय पाणीच येत नाही. याला काय म्हणावे, आसरा येथील मजीप्रा.ची ही योजनाच कुचकामी ठरत आहे, अशी नागरिकांमधून ओरड होत आहे.

Web Title: Water supply one day a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.