वरूडमध्ये चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:28+5:302021-07-04T04:09:28+5:30

शहरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष ...

Water supply in Warud for four to five days | वरूडमध्ये चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा

वरूडमध्ये चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा

Next

शहरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून येतो. दरवर्षी पाणीपट्टी कर नागरिकांकडून वसूल करण्यात येत असला तरी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याकरिता बहुजन वंचित आघाडीच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर ८ जुलै गुरुवारी हजारो नागरिकांसह पाण्याच्या टाकीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी दिला आहे. यावेळी अशोक गडलिंग, ॲड. प्रदीप दुपारे, अरविंद गाडगे, अमर हरले, नीलेश अधव, विनोद सोनागोते, राहुल लांडगे, महेंद्र निस्वादे, नितेश डबरासे, योगेश बिसांद्रे, रोशन गाठे, राकेश गाठे, अक्षय तागडे, तेजस नागले, अनिकेत रामटेके, अक्षय तागडेसह, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Water supply in Warud for four to five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.