पथ्रोट येथील जलशुद्धीकरण केंद्र होणार स्वयंचलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:18+5:302021-09-17T04:17:18+5:30

फोटो - पथ्रोट : पथ्रोटकरांची तहान भागविणारे शहानूर जलाशय परिसरात असलेले जलशुद्धीकरण केंद्र स्वयंचलित होणार आहे. जिल्हाभरातील स्वयंचलित ...

The water treatment plant at Pathrot will be automated | पथ्रोट येथील जलशुद्धीकरण केंद्र होणार स्वयंचलित

पथ्रोट येथील जलशुद्धीकरण केंद्र होणार स्वयंचलित

Next

फोटो -

पथ्रोट : पथ्रोटकरांची तहान भागविणारे शहानूर जलाशय परिसरात असलेले जलशुद्धीकरण केंद्र स्वयंचलित होणार आहे. जिल्हाभरातील स्वयंचलित यंत्रणा जलशुद्धीकरण केंद्रात राबविण्याचा बहुमान पथ्रोट जलस्वराज्य-२ प्रकल्प मिळवणार असल्याने गुणवत्तापूर्ण, शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल तसेच केंद्रातील यंत्रांचे आयुष्यमान वाढेल आणि मानवी चुका व देखभाल-दुरुस्ती खर्च कमी होईल.

पथ्रोटपासून नजीक शहानूर जलाशयातून दर्यापूर, अंजनगाव शहरासह १५६ गावांसह ७९ अधिभारित गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र, पथ्रोट तहानलेले होते. ग्रामपंचायतीच्या गत पंचवार्षिकमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने १६ कोटी ५९ लाख ३० हजार रुपयांची महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळून ती प्रत्यक्षात साकारली. महत्त्वपूर्ण जलशुद्धीकरण केंद्र व वितरण व्यवस्था स्वयंचलित व्हावी, या दृष्टीने जलस्वराज्य-२ प्रकल्पाचे अध्यक्ष व सचिव यांनी अमरावती येथील कार्यकारी मुख्य अभियंता यांच्याशी चर्चा केली. हे जलशुद्धीकरण केंद्र स्वयंचलित करण्याची मागणी करून प्रस्ताव सादर केला. संबंधितांनी प्रस्ताव मंजूर करून साहित्य प्रकल्पस्थळी पाठविले. कामास सुरवात झाली असल्याने भविष्यात यंत्रणा कार्यान्वित होईल.

जिल्हाभरातील ग्रामीण भागात जलस्वराज्य-२ योजनेंतर्गत पथ्रोट, जरूड, अंजनगाव बारी, मंगरुळ दस्तगीर, सुकळी हे प्रकल्प आहेत. त्यापैकी जरूड व पथ्रोट येथे जलशुद्धीकरण केंद्रात स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होत आहे. अमरावती महानगरासारख्या ठिकाणी जलशुद्धी केंद्रावर सेमी ऑटोमायझेशन यंत्रणा आहे. मात्र, ग्रामीण भागात पथ्रोट येथील प्रकल्पावर आता स्वयंचलित यंत्रणा होत आहे. परिणामी देखभाल-दुरुस्ती खर्च कमी होऊन फिल्टरचे आयुष्यमान वाढेल.

- ................. पाटील, कार्यकारी मुख्य अभियंता, अमरावती

अधिकाऱ्यांनी योजनेचा प्रकल्प आराखडा तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त समावेश केल्याने प्रकल्पास त्याचा लाभ झाला. स्वयंचलित यंत्रणेची आम्ही मागणी केली असता, ती मंजूर होऊन कार्यान्वित होत असल्याने आम्ही समाधानी आहोत.

- योगेश दुबे, सचिव, जलस्वराज्य-२ पथ्रोट

Web Title: The water treatment plant at Pathrot will be automated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.