मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाणवठे तुडूंब, वन्यजीवांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:04+5:302021-05-21T04:13:04+5:30

फोटो २०एएमपीएच१९, २०एएमपीएच२० गणेश वासनिक अमरावती : यंदा मार्च, एप्रिल ते १५ मे यादरम्यान सूर्य चांगलाच तापला. ४३ ते ...

Waterlogging at Melghat Tiger Reserve, relief to wildlife | मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाणवठे तुडूंब, वन्यजीवांना दिलासा

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाणवठे तुडूंब, वन्यजीवांना दिलासा

Next

फोटो २०एएमपीएच१९, २०एएमपीएच२०

गणेश वासनिक

अमरावती : यंदा मार्च, एप्रिल ते १५ मे यादरम्यान सूर्य चांगलाच तापला. ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र गत चार दिवसांपासून आल्हाददायक वातावरण आहे. अशातच वादळी पाऊसदेखील पडला. या पावसाने हल्ली उकाळा होत असला तरी जंगलक्षेत्र, राखीव वनांत वन्यजीवांच्या पाण्याची समस्या सुटली आहे. विशेषत: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठे तुडूंब भरले असून, वन्यजीवांना दिलासा मिळाला आहे.

मेळघाटात हल्ली वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी ७४८ पाणवठे आहे. यात नैसर्गिक ४४९ तर, कृत्रिम २९९ पाणवठे निर्माण करण्यात आले आहे. सिपना, गुगामल, अकोट व अकोला वन्यजीव विभाग अंतर्गत पाणवठ्यांच्या सुरक्षेसाठी वरिष्ठ अधिकारी स्तरावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू होताच राखीव जंगल, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उभी होत होती. मात्र आता वादळी पाऊस कोसळल्याने पाणवठे तुडूंब भरलेत. पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची शिकार अथवा विषप्रयोग होणार नाही, यासाठी वनपाल, वनमजूर, वनपरिक्षेत्राधिकारी अशी सुरक्षेसाठी साखळी तयार करण्यात आली आहे. पाणवठ्याचे ‘डे टू डे’ अहवाल उपवनसंरक्षकांकडे पाठविण्यात येत आहे. पाणवठ्यांच्या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे. मेळघाटात ७२ वाघ असल्याची नोंद आहे.

---------------

बॉक्स

मेळघाटातील हे आहेत मुख्य वन्यप्राणी

मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, हरिण, काळवीट, सांबर, तडस, मोर, लांडोर, हरियल पक्षी, नीलगाय यासह जलचर प्राणी, सरपटणारे प्राण्यांचा समावेश आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात १५०० हेक्टर कोअर परिसर, १२६८ हेक्टर बफर झोन आणि १९० हेक्टर परिसर पर्यटन क्षेत्र आहे. सिपना वन्यजीव अंतर्गत १६१, गुगामल २६४, अकोट १९४, अकोला वन्यजीव विभागात १२९ पाणवठे आहेत.

---------

कोट

गत आठवड्यात मेळघाटचा दौरा केला. काही नैसर्गिक पाणवठ्यांवर वन्यजीव तृष्णा तृप्ती करताना दिसून आले. अतिशय सुंदर असे चित्र होते. हल्ली मेळघाटात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर उन्हाळ्यासारखी स्थिती नाही.

- जयोती बॅनर्जी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

Web Title: Waterlogging at Melghat Tiger Reserve, relief to wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.