कोरोना परतीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:00 AM2020-10-17T05:00:00+5:302020-10-17T05:00:25+5:30
राज्य शासनाने ह्यअनलॉक-५ह्णमध्ये बाजारपेठ, मार्केट, दुकाने, चित्रपटगृहे, खासगी ग्रंथालये, बस, रेल्वे, लोकल ट्रेन, परराज्यातील प्रवासाला मुभा दिली आहे. ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकावर कोरोना नियमावलीचे पालन करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. मास्कचा वापर, हात धुणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन ही त्रिसूत्री अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या ओसरल्याने दिसत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मार्च ते सप्टेंबर या काळात कोविड-१९ संदर्भात असलेले भय ऑक्टोबरमध्ये संपल्याचे चित्र आहे. ऑगस्ट, सप्टेंबर हे दोन महिने कोरोनासाठी ह्यपॉझिटिव्हह्ण ठरले, तर ऑक्टोबरमध्ये संक्रमितांची संख्या ओसरत चालली आहे. मृत्युदरही नियंत्रणात आला आहे. त्यामुळे आता कोरोनालाच ह्यआ अब लौट चले...ह्ण असे म्हणण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत. प्रशासनाने तूर्तास ह्यवेट अँड वॉचह्णची भूमिका घेतली आहे.
राज्य शासनाने ह्यअनलॉक-५ह्णमध्ये बाजारपेठ, मार्केट, दुकाने, चित्रपटगृहे, खासगी ग्रंथालये, बस, रेल्वे, लोकल ट्रेन, परराज्यातील प्रवासाला मुभा दिली आहे. ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकावर कोरोना नियमावलीचे पालन करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. मास्कचा वापर, हात धुणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन ही त्रिसूत्री अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या ओसरल्याने दिसत आहेत. १ ते १५ ऑक्टोबर यादरम्यान १९५८ कोरोना ह्यपॉझिटिव्हह्ण आढळून आले. मात्र, १२ ऑक्टोबरपासून संक्रमितांच्या अहवालात तिहेरी आकडा आलेला नाही. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये ३८९२, तर सप्टेंबर महिन्यात ५२६७ संक्रमित आढळून आले होते. हल्ली मृत्युदरातही कमालीची घसरण झाली आहे. १५ दिवसांमध्ये उपचारादरम्यान कोरोनाने ५६ रुग्ण दगावले. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये ६८ आणि सप्टेंबर महिन्यात १०७ रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला.
१५ कोविड हॉस्पिटल, ५ हेल्थ सेंटरची सुविधा
कोरोनाग्रस्तांना प्रकारे उपचार देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही खासगी हॉस्पिटलना रुग्णसेवेची परवानगी दिली. चाचण्यांमध्ये वाढ करून संक्रमितांचा शोध घेण्यात आला. विविध उपाययोजनांमुळे हळूहळू कोरोनावर मात केली जात आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.
कोरोना संक्रमित रुग्णांवर योग्य उपचार व्हावा, यासाठी आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यात १५ कोविड हॉस्पिटल आणि पाच हेल्थ सेंटर साकारले आहे. एकूण बेड संख्या १५३६ असून, ५५० रुग्ण उपचार घेत आहेत. ९८६ रिक्त बेड अद्याप आहेत. एकूण रुग्णसंख्या बघता, कोरोनाला परतीचे वेध लागले आहे.