आयुष्याच्या वाटेवर 'ती' लिफ्ट ठरली निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:06 PM2018-08-27T22:06:19+5:302018-08-27T22:06:35+5:30

रोज तपोवन ते पंचवटी चौकातील राठी विद्यालयात इयत्ता नववीचा विद्यार्थी आपल्या मावशीच्या घरून दररोज सहा किलोमीटर पायी चालत येत असताना एके दिवशी त्याने मागितलेली लिफ्ट आयुष्याचा प्रवास करणारी ठरली.

On the way of life, it was the key to lift the key | आयुष्याच्या वाटेवर 'ती' लिफ्ट ठरली निर्णायक

आयुष्याच्या वाटेवर 'ती' लिफ्ट ठरली निर्णायक

- चेतन घोगरे
अमरावती- रोज तपोवन ते पंचवटी चौकातील राठी विद्यालयात इयत्ता नववीचा विद्यार्थी आपल्या मावशीच्या घरून दररोज सहा किलोमीटर पायी चालत येत असताना एके दिवशी त्याने मागितलेली लिफ्ट आयुष्याचा प्रवास करणारी ठरली. त्यामुळे रामच्या साथीला धावली पोलिसाची खाकी वर्दी असे बोल बोलले जात आहेत. त्या मुलाला शैक्षणिक मदत म्हणून शालेपयोगी साहित्य तसेच एक सायकल भेट देण्यात आली.

राम मने (१४) हा विद्यार्थी  रोज तपोवन ते राठी विद्यालय रोज पायीच प्रवास करत होता. या प्रवासात तो नेहमी कोणत्याही व्यक्तीला लिफ्ट मागत असे. याच मार्गावर नेहमी प्रवास करणारे ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी रामला दोन ते चार वेळा आपल्या चारचाकी वाहनातून शाळेत सोडले. त्यांनी त्याला त्याच्या परिवाराबद्दल माहिती विचारली असता, तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे सांगितले.

आई मोलमजुरी करून पोट भरते व तपोवन परिसरात राहत असलेल्या मावशीच्या घरी राहून शिक्षण घेत असल्याचे सांगितले. त्याला त्याच्या वडिलांबद्दल  विचारणा केली असता, दारुड्या बापाने उकीरड्यावर फेकल्याचे व त्याच्यापासून वेगळे होऊन आईनेच वाढविल्याचे त्याने सांगितले. माझ्या आईने मला उकीरड्यावरून उचलून आणले त्याचवेळी माझ्या मनाच्या हळव्या कप्प्यातून घरातून कायमस्वरूपी हद्दपार केले, असे तो म्हणाला. विलास कुलकर्णी यांनी त्याला शालेपयोगी साहित्य देण्याचे सांगितले. रामने नकार दिला. तू तुज्या आईला व मावशीला विचार मग माझ्याकडे ये, असे सांगून वाहतूक निरीक्षक कुलकर्णी तेथून निघून गेले. दुसºया दिवशी राम मने हा विद्यार्थी तपोवन परिसरात राहत असलेल्या विलास कुलकर्णी त्यांच्या घरी जाऊन मला फक्त दप्तर द्या, असा म्हणाला. कारण मी सध्या जे दप्तर वापरत आहे, ते पण माझ्या एका मित्राने दिले आहे, असे सांगताच  कुलकर्णी यांनी त्याचे दप्तर तपासले असता त्यामध्ये तीन फाटक्या वह्या मिळून आल्या. विशेष बाब म्हणजे नवव्या वगार्तील एकही विषयाचे पुस्तक त्याच्याकडे नव्हते. त्याचवेळी कुलकर्णी यांनी रामला काही तरी मदत करायची, असे ठरवले तसेच या मदतीस आणखीच भर पडली जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लिपिक देवानंद भोजे यांनी रामला सायकल देण्याचे कबूल केले. वाहतूक निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी नवीन दप्तर वर्षभरासाठी लागणारे नोटबुक कंपास, दोन पेन पाकीट, टिफिन, वॉटर बॅग व इतर शालेपयोगी साहित्य दिले वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी विनोद दाभणे यांनी गाइडचा संच दिला तसेच यापुढेसुद्धा  काहीही गरज भासली तर  निसंकोचपणे येऊन भेट, असे रामला  सांगीतले आयुष्यात पहिल्यांदाच एवढं नवसाहित्य पाहून रामच्या चेहºयावर  आनंद ओसंडून वाहत होता. काही वेळात राम ने सायकलवर टांग मारली अन् हवेत तरंगत जात असल्याच्या अविर्भावात तो दिसेनासा झाला.

आयुष्यात मी मोठा माणूस बनणार 
रामने घरी जाताना या सर्वांचे मनापासून आभार मानत, मी आयुष्यात मोठा झाल्यावर मोठा माणूस बनण्याचं वचन दिलं.

Web Title: On the way of life, it was the key to lift the key

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.