प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगितलं राज'कारण'
By गणेश वासनिक | Published: April 24, 2023 11:17 AM2023-04-24T11:17:19+5:302023-04-24T11:18:40+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महात्मा फुले ॲग्रिकल्चर फोरमच्या वतीने अमरावती येेथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी आले असता, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते
गणेश वासनिक
अमरावती : राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातील सांगता येणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महात्मा फुले ॲग्रिकल्चर फोरमच्या वतीने अमरावती येेथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी आले असता, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, कोणाला फोडाफोडीचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे, आम्ही आमची भूमिका घ्यायची ती घेऊ, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्यावर कर्ज बुडविल्याप्रकरणी जेपीसी नेमण्याच्या मागणीविषयी बोलताना जेपीसी हा त्यावरील तोडगा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
...म्हणून प्रकाश आंबेडकरांनी घेतली भेट
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने भेट झाल्याच्या चर्चेला त्यांनी दुजोरा दिला.