"आम्ही घरंदाज बायका, ती आचरट, विचरट, विचकट काम करते"; राणांविरुद्ध संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:34 PM2022-09-13T15:34:40+5:302022-09-13T21:35:12+5:30

त्या बाईवर मी बोलणार नाही, ज्या मुलीने १३ व्या वर्षी घाणरेड्या चित्रपटांना प्रसिद्धी दिलीय, तिच्यावर आम्ही बोलणार नाही

"We are housewives, she works hard"; Kishori Pednekar Rage against the Navneet Rana's | "आम्ही घरंदाज बायका, ती आचरट, विचरट, विचकट काम करते"; राणांविरुद्ध संताप

"आम्ही घरंदाज बायका, ती आचरट, विचरट, विचकट काम करते"; राणांविरुद्ध संताप

googlenewsNext

मुंबई -  अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात पाच दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालून राडा घातलेला होता. त्यामुळे नवनीत राणा यांचा सर्व स्तरावरून विरोध होत असताना आज अमरावती पोलिसांच्या समर्थनार्थ निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलीस आयुक्त अर्ज सिंग यांच्याकडे निवेदन दिले. राणा दाम्पत्यावर याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत, विचारले असता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्या बाईवर मी बोलणार नाही, असेम म्हटले. 

त्या बाईवर मी बोलणार नाही, ज्या मुलीने १३ व्या वर्षी घाणरेड्या चित्रपटांना प्रसिद्धी दिलीय, तिच्यावर आम्ही बोलणार नाही, आम्ही घरंदाज बायका आहोत, असे म्हणत किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांवर जहरी टिका केली. तसेच, राणा दाम्पत्यावर अमरावतीत बदनामीचा गुन्हा दाखल झाला असल्यासंदर्भात विचारणा केली असता, तिच्यावर आणखी गुन्हे दाखल होतील. ती आरचट, विचरट, विचकट काम करते, त्यामुळे तिच्यावर ते गुन्हे दाखल होणारच असे पेडणेकर यांनी म्हटले. 

शिवसेना आणि नवनीत राणा हा वाद जुनाच आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना नवनीत राणा यांनी मुंबईतील मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आंदोलन छेडलं होतं. त्या, आंदोलनानंतर राणा दाम्पत्यास अटकही झाली होती. तर, शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्या निवासस्थानावर धडक दिली होती. तेव्हापासून शिवसेना आणि राणा असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. 
 

Web Title: "We are housewives, she works hard"; Kishori Pednekar Rage against the Navneet Rana's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.