आम्ही पिशवीत नेऊन खातो, ते पिशवीच खातात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 04:39 PM2024-06-07T16:39:31+5:302024-06-07T16:39:54+5:30
Amravati : आपला निष्काळजीपणा बनला जनावरांच्या जीवाला धोका
मनीष तसरे
अमरावती : भाजीपाला, फळ तसेच इतरही वस्तूसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर केला जातो. परंतु उपयोगानंतर प्लास्टिक पिशवी फेकून दिल्या जात असल्याने जनावरे ही प्लास्टिक पिशवी खात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे.
प्लास्टिकचे धोके काय?
• प्लास्टिक म्हणजे आपल्या पृथ्वीवरचे संकटच म्हणावे लागेल. जंगल, जमीन, नद्या, महासागर प्लास्टिकच्या कचऱ्याने व्यापले आहे.
• प्लास्टिकचे कित्येक वर्षे विघटनच होत नाही, त्यामुळे ते तसेच पडून राहते. त्यामुळे पाण्याचे स्रोतदेखील प्रदूषित झाले आहे.
• नद्या, समुद्र या विळख्यात आहेत. पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत. जमिनीचा पोत घसरला असून, भूगर्भातील पाणी प्रदूषित झाले आहे.
प्लास्टिकचा जनावरांनाही धोका
शहरातील जनावरांसाठी प्लास्टिक मोठा धोका ठरला आहे. जवळपास ८० टक्के गायी, म्हशी अन्नासोबत प्लास्टिकदेखील खातात. पोटामधील आतडे व इतर अवयवांची हालचाल होताना त्या सोबत प्लास्टिकदेखील गुंडाळले जाते. यामुळे पचन तंत्र बिघडते, गॅसेस तयार होतात व त्यातून विषबाधा होते. तसेच रवंथ प्रक्रिया बंद पडते व त्यातून त्यांचा मृत्यू होतो.
- डॉ. सागर ठोसर, पशुवैद्यकीय अधिकारी