ऐकावे ते नवलच; किडनीसाठी केले लग्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 04:31 PM2021-08-06T16:31:51+5:302021-08-06T16:32:27+5:30

Amravati News वरूड पोलीस ठाण्यात एक अजबच तक्रार नोंदविण्यात आली आहे. ही तक्रार आहे चक्क किडनीबाबतची.

Wedding done for the kidneys! | ऐकावे ते नवलच; किडनीसाठी केले लग्न!

ऐकावे ते नवलच; किडनीसाठी केले लग्न!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती: पत्नीच्या माहेरकडून चांगला हुंडा मिळावा, अडल्यानडल्याला सासर कामी पडावे, दुचाकी, चारचाकी मिळावी, शासकीय नौकरीसाठी सासर्याने मदत करावी, अशा अनेक हेतूने लग्न जुळविल्या जातात. मात्र ते हेतू साध्य न झाल्यास विवाहितांना शारिरिक मानसिक छळाला सामोरे जावे लागते. अशा नानाविध तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदविल्या जातात. मात्र वरूड पोलीस ठाण्यात एक अजबच तक्रार नोंदविण्यात आली आहे. ही तक्रार आहे चक्क किडनीबाबतची. पतीने किडनीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने पतीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालविला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.            

५ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास त्या पिडित विवाहितेने वरूड पोलीस ठाणे गाठून पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला. सागर रमेश दातीर (२९, रा. जरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, मारहाण, कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, आरोेपी व पिडिताचे मे २०१९ मध्ये लग्न झाले. आरोपी पतीला लग्नाआधीच किडनीचा आजार होता. त्याचे डायलिसीसही सुरू होते. मात्र पत्नीपासून त्याने ते दडवून ठेवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडिताने पतीला जाब विचारला. त्यावर तू मला किडनी द्यावी, म्हणूनच तुझ्याशी लग्न केले, असे उत्तर त्याने दिले. त्यामुळे आरोपी पतीने आपल्याला शिवीगाळ करून मारहाण देखील केली, असे त्या विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. २१ मे २०१९ ते ५ फेब्रुवारी २९२० दरम्यान या घटना घडल्या. किडनीच्या कारणावरून पतीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालवल्याचे देखील पिडिताने पोलीस तक्रारीत नमूद केली आहे.

संबंधित २९ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरू तिच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला. स्वत:ची किडनी द्यावी, म्हणून आरोपीने पिडिताशी लग्न केले, असे तक्रारीत नोंद आहे.

प्रदीप चौगावकर, ठाणेदार, वरूड

Web Title: Wedding done for the kidneys!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न