कढाव फाट्याजवळ लग्नवरातीचे वाहन उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:17+5:302021-06-09T04:16:17+5:30
मध्यप्रदेशातील दहेंदा रामखेडा गावातील किसन गुलाब दहिकर या युवकाचा धारणी तालुक्यातील घोटा मालूर येथील युवतीशी सोमवारी दुपारी १२ वाजता ...
मध्यप्रदेशातील दहेंदा रामखेडा गावातील किसन गुलाब दहिकर या युवकाचा धारणी तालुक्यातील घोटा मालूर येथील युवतीशी सोमवारी दुपारी १२ वाजता विवाह संपन्न झाला. त्या विवाहाकरिता नवरदेव किसन यांच्या गावातील २५ नातेवाईक पिकअप वाहनाने व १५ महिला नातेवाईक बोलेरो वाहनाने घोटा गावात आले. विवाह सोहळा सपन्न झाल्यानंतर नवरदेव-नवरीला घेऊन वराती परत निघाले असता, पिकअप वाहन धारणी-बऱ्हाणपूर मुख्य महामार्गावरील कढाव फाट्याजवळ नियंत्रण सुटल्याने अचानक पलटी झाले. त्यातील काही प्रवासी वाहनाबाहेर फेकले गेले. काही वाहनातच पडून राहिले, ते सुखरूप असल्याने त्यांनी कमल नंदू पटोरकर (२०), हरिप्रसाद दहिकर (४५), तुळशीराम कासदेकर (४२) जुन्यासिंग पटेल (५५), रामचंद सावलकर (५०) सोन्या बेठेकर (६६) (सर्व रा. दहेंदा, रामखेडा मध्यप्रदेश) सहा जखमींना बाहेर काढले व रुग्णवाहिका चालकाला फोनद्वारे बोलावून घेतले व उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. तेथील वैदयकीय अधीक्षक रेखा गजरालवार वैद्यकीय अधिकरी धनंजय पाटील यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर अन्य चार जण गंभीर जखमी आहेत.