कोरोनाकाळात मुलांचे वजन वाढले, स्थूलतेमुळे पालक चिंतित, शाळा बंद असल्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:16 AM2021-09-05T04:16:51+5:302021-09-05T04:16:51+5:30
परतवाडा : कोरोना महामारीच्या दीड वर्षांनंतरही शाळा सुरू झालेल्या नाहीत. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. यात मुलांच्या शारीरिक ...
परतवाडा : कोरोना महामारीच्या दीड वर्षांनंतरही शाळा सुरू झालेल्या नाहीत. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. यात मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे सतत मोबाईल आणि दिवसभर टीव्हीमुळे मुलांमध्ये चिडचिड वाढली आहे. बैठ्या जागेवर सतत काही ना काही खात राहण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यात अतिपोषण ही समस्या झाली आहे. मुलांचे वजन वाढले आहे. मुलांमधील स्थूलता चिंतेचा विषय बनला आहे. पालक चिंतित आहेत.
जिल्ह्यातील कुपोषित बालके--
कुपोषित ५ हजार ११२
तीव्र कुपोषित ६१३
शहरात स्थूलता ही नवी समस्या
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मुलांना घराबाहेर पडता येत नाही. यात त्यांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. मुलांची वजन वाढली आहेत. १५ ते १८ किलो वजनाच्या मुलाचे वजन ४० ते ४२ किलोपर्यंत गेले आहे. त्यांच्यात लठ्ठपणा जाणवायला लागला आहे. यातून स्थूलता ही नवी समस्या शहरात उभी ठाकली आहे.
** स्थूलतेची कारणे काय?
1) एकाच ठिकाणी बसून राहणे.
2) शारीरिक हालचाली नसणे.
3) सतत टीव्ही पाहणे आणि आणि मोबाईलचा अधिक वापर.
4) जंक फूडचे अधिक सेवन.
5) सतत काही ना काही खाणे.
कोट : कोरोना काळात मुलांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी थांबल्या आहेत. एकाच ठिकाणी बसून राहणे आणि सतत मोबाईल, टीव्ही पाहणे, जंक फूडचे अधिक सेवन यामुळे मुलांचे वजन वाढत आहे. त्यात लहान मुलांचे वजन ४० ते ४५ किलोपर्यंत गेले आहे. स्थूलता ही नवी समस्या निर्माण झाली आहे.
- डॉ. इंद्रनील ठाकरे, बालरोगतज्ज्ञ, परतवाडा.
कोट : कोविड-१ आणि २ मध्ये शाळा बंद राहिल्यामुळे मुलांच्या आहार, झोप आणि शारीरिक हालचालींवर नकारात्मक परिणाम झाला. परिणामी मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला. लॉकडाऊनपूर्वी नोंदवलेल्या वर्तनांच्या तुलनेत कोविड काळात मुलांनी दररोज जास्त पौष्टिक तसेच अतिरिक्त जेवण घेतले. एक ते दीड तास अतिरिक्त झोप घेतली. मोबाईल, संगणक आणि टीव्ही स्क्रीनसमोर दररोज सुमारे तीन ते पाच तास घालवले. दुसरीकडे मात्र शारीरिक हालचालींमध्ये लक्षणीयरीत्या घट झाली. यातून स्थूलता ही समस्या पुढे आली आहे.
- डॉ. देवेंद्र रा. गिरी, आयुर्वेदिक तज्ज्ञ, कांडली
पालकांचीही चिंता वाढली
कोट:-- शाळा बंद असल्यामुळे मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर ज्लाल्या जात आहे. याचा परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होत आहे. सतत बसून ऑनलाईन क्लास करीत असल्यामुळे मुलांची स्थूलता वाढली आहे. मुले चिडचिड करीत आहेत. यामुळे आमची चिंता वाढली आहे.
- अनिरुद्ध पाटील, अमरावती, पालक.
कोट : ऑनलाइन शिक्षण वाईट आहे. मुलांना ते समजत नाही. कधी आवाज ऐकू येत नाही, तर कधी दुसऱ्याच आवाजासह उलटी स्क्रीन डोळ्यांसमोर येते. शाळा बंद असल्यामुळे मुलांना चिंता नाही. झोपायला उशीर. उठायलाही उशीर. मुले अभ्यास करीत नाहीत. घरच्यांना त्रास देतात. त्यांच्यात चिडचिड वाढली आहे. त्याचा डोळ्यांवरही परिणाम होत आहे. ४५ दिवसांच्या सिलॅबस अंतर्गत सेतूचे पाठ लिहून काढण्यातच वेळ जात आहे. मुलांचे जेवणही वाढले आणि वजनही वाढले. लेकरं ऐकत नाहीत. शाळा सुरू व्हायला हव्यात.
- अर्जुन घुगे, कांडली, पालक.