लाखो रुपयांचे वजनकाटे नादुरुस्त

By Admin | Published: June 26, 2017 12:13 AM2017-06-26T00:13:33+5:302017-06-26T00:13:33+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी इलेट्रॉनिक वजनकाटे घेण्याचा ठराव पास करून....

Weight loss of millions of rupees | लाखो रुपयांचे वजनकाटे नादुरुस्त

लाखो रुपयांचे वजनकाटे नादुरुस्त

googlenewsNext

वजनात तफावत : खरेदीतही अफरातफर, बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष
चेतन घोगरे । लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी इलेट्रॉनिक वजनकाटे घेण्याचा ठराव पास करून यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र यातील बरेचशे काटे नादुरस्त आहेत, तर काही बंद अवस्थेत असल्यामुळे बाजार समितीने केलेल्या वजनकाट्यांच्या खरेदीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
६ जून २०१६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत शेतकऱ्यांच्या मालाची योग्य मोजणी व्हावी, यासाठी इलेट्रॉनिक वजनकाटे खरेदीचा ठराव पास केला. यासाठी बाजार समितीने सनवे इलेट्रिकल्स अ‍ॅण्ड इलेट्रॉनिक्स अमरावती या कंपनीकडून १५ वजनकाटे व १० इलेट्रॉनिक्स वजनी काट्याच्या मोडिफिकेशनचा ठराव यावेळी घेण्यात आला.
१५ वजनी काट्यांचे २ लाख ८० हजार ९१२ रुपयांचे बिलसुद्धा अदा करण्यात आले. मात्र, २५ मार्च २०१७ रोजी झालेल्या आमसभेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी विकत घेतलेले वजनकाटे चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे सनवे इलेट्रॉनिक & इलेट्रिकल्सचे मंजूर बिल देण्यात येऊ नये, असा ठरावसुद्धा पारित करून घेतला. १५ वजनी काट्यांचे खरेदी बिल बाजार समितीने अदा केले व १० वजनी काट्याचे बिल दिलेले नाहीत.
८० ते ८५ किलो वजनाचे इलेट्रॉनिक वजनी काटे विकत घेण्याचे ठरविण्यात आल्यावरही बाजार समितिच्या सचिव व काही संचालकानी इलेट्रॉनिक वजन काटे कंपनीशी हात मिळवनी करीत ६० ते ६५ किलो वजनाचे काटे खरेदी केले. त्यामुळे घेण्यात आलेले वजनकाटे नादुरुस्त आहेत. त्यामुळे बाजार समितिने २२ वजनकाटे आपल्या गोडावूनमध्ये ठेवून दिले आहे. ३ वजनी काटेच बाजार समितीत दिसुन येत आहेत. तेही बंद अवस्थेत आहे.

खविसंचा अहवाल सादर
शासकीय तूर खरेदी (नाफेड) सुरू असताना या विकत घेतलेल्या वजनी काट्यावर वजन केले असता मोठ्या प्रमाणात वजनामध्ये तफावत आढळून आली होती. तसा लेखी अहवाल खरेदी विक्री संघ अंजनगाव सुर्जी यांनी बाजार समितीला सादर केला होता.

आम्ही जे वजनकाटे बाजार समितिला दिले ते सुरळीत सुरू आहेत. पण बाजार समिती त्या वजनकाट्याची देखरेख व्यवस्थितरीत्या करीत नसल्यामुळे ते बंद पडत आहेत.
- सुनील धोटे, वजनकाटे विक्रेता

बाजार समितीमध्ये लावण्यात आलेली वजनीकाटे नादुरुस्त असून ते गोडावूनमध्ये ठेवण्यात आले आहे, तर काही सुरू आहेत.
- गजानन नवघरे
सचिव बाजार समिती, अंजनगाव

Web Title: Weight loss of millions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.