पुणे-काझीपेठ सुपरफास्टला बडने-यात थांबा, नवीन गाडीचे जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 08:51 PM2017-10-21T20:51:58+5:302017-10-21T20:52:54+5:30
नव्याने सुरू झालेल्या पुणे-काझीपेठ या साप्ताहिक रेल्वे गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अमरावतीत शनिवार ( 21 आॅक्टोबर) या नव्या गाडीचे स्वागत स्थानकावर करण्यात आले.
बडनेरा(अमरावती) : नव्याने सुरू झालेल्या पुणे-काझीपेठ या साप्ताहिक रेल्वे गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. शनिवार ( 21 आॅक्टोबर) या नव्या गाडीचे स्वागत स्थानकावर करण्यात आले. यामुळे अमरावती जिल्ह्याकडील प्रवाशांची सोय झाली आहे.
आठवड्यातून एकदा धावणा-या अप व डाऊन पुणे काझीपेठ रेल्वे गाडीला थांबा मिळावा, यासाठी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पाठपुरावा केला.
दर शनिवारी सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी, तर दर सोमवारी काझीपेठ-पुणे ही गाडी रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी ही गाडी बडने-यात पोहोचेल. येथे तीन मिनिटांचा थांबा येथे देण्यात आला. दरम्यान, झेडआरयूसीसीचे सुनील भालेराव, स्टेशन मास्तर आर.डब्ल्यू. निशाणे, सुरेश रतावा, विनोद कलंत्री, रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, रेल्वे सुरक्षा बलाचे सी.एच.पटेल, सहायक पोलीस निरीक्षक पी.व्ही.चक्रे, नगरसेविका अर्चना धामणे, निखिल गाले, विनायक ठाकरे, प्रवीण सिरसाट, उमेश वाठ, राजू अक्कलवार, मिथून सोळंके, कुचिन कैथवास यासह शिवसेनेचे इतरही कार्यकर्ते या गाडीच्या स्वागतासाठी उपस्थित होते.