वांझोटे बियाणे उठले शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:07 AM2018-07-10T00:07:22+5:302018-07-10T00:07:42+5:30

गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजचे ९,३०५ व मयूर व सुंदरम कपंनीच्या सोयाबीन वाण अत्यल्प उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत १०० वर तक्रारी संबंधित तालुक्यात दाखल झाल्याच्या वृताला कृषी विभागाने सोमवारी दुजोरा दिला आहे.

Wennyzote seeds rose on the farmers | वांझोटे बियाणे उठले शेतकऱ्यांच्या मुळावर

वांझोटे बियाणे उठले शेतकऱ्यांच्या मुळावर

Next
ठळक मुद्देदुबार पेरणीचे सावट : महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची उगवणच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजचे ९,३०५ व मयूर व सुंदरम कपंनीच्या सोयाबीन वाण अत्यल्प उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत १०० वर तक्रारी संबंधित तालुक्यात दाखल झाल्याच्या वृताला कृषी विभागाने सोमवारी दुजोरा दिला आहे.
यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग, उडदाचे पीक बाद होऊन सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे अचानकपणे सोायाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले आहे.
जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात कोल्हा-काकडा, रासेगाव, असदपूर, भातकुली तालुक्यात टाकरखेडा संभूमध्ये महाबीज व दर्यापूर तालुक्यात येलकी, यरंडी, गणेशपूर, दारापूर, शिंगणापूर आदी गावांमध्ये मयुर व सुंदरम या बियाणे कंपनी विरोधात शेतकºयांच्या कृषी विभागाकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक असताना तुरीची उगवण क्षमता चांगली झाली. त्यामुळे पावसाचा खंड आदी कुठलेही कारण या ठिकाणी देता येणार नाही.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी आयुक्तांचे १७ आॅक्टोबर २०१३ च्या आदेशान्वये पाच सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना झालेली आहे. या समितीद्वारा काही तक्रारींची पाहणी करण्यात आली. याविषयीचा अहवाल अद्याप अप्राप्त असला तरी बहुतांश ठिकाणी बियाण्यांची गुणवत्ता खराब असल्याने उगवण झालेली नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाºयाने सांगितले.
याबाबत महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक प्रवीण देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.

उपविभागीय कृषी अधिकारी समितीचे अध्यक्ष
बियाणे, खते व कीटकनाशकासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेण्यासाठी कृषी आयुक्तांचे आदेशान्वये जिल्ह्यातील १४ तालुक्यात पाच सदस्यीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या समितीमध्येसबंधीत तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र व महाबीजचे प्रतिनिधी तसेच पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी सदस्य आहेत. तालुक्यात तक्रार होताच तिची नोंदवहीत नोंद घेऊन लगेच समिती अध्यक्षांकडे पाठविणे बंधनकारक आहे.

तक्रारीनंतर सात दिवसांत शेताची पाहणी अनिवार्य
तक्रार प्राप्त होताच ७ दिवसांच्या आत समिती अध्यक्षांनी समिती सदस्यांची भेट घेणे व सर्व सदस्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे.
शेतकºयांकडे निविष्ठा खरेदीच्या पावत्यांची शहानिशा करून विहीत प्रपत्रात पंचनामा करून प्रत शेतकरी व कंपनीच्या प्रतिनिधींना देणे
तक्रार अशलेल्या बियाण्याच्या प्लॉटचट नमुना घेवूण अधिसुचित प्रयोगशाळेत तपासणी करावयास पाठवीणे बंधनकारक आहे.
तक्रार ज्या कंपनी विरोधात आहे. त्यांच्या प्रतिनिधीला व कृषी विके्रत्याला पाहणीच्या वेळी बोलावणे, त्यांची व शेतकºयाची साक्ष घेणे बंधनकारक

Web Title: Wennyzote seeds rose on the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.