पश्चिम विर्दभात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:23+5:302021-06-20T04:10:23+5:30

अमरावती : विदर्भात १० जूनदरम्यान मान्सूनचे आगमन झाले असले तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. आठ दिवसापासून विखुरलेल्या स्वरुपात पाऊस ...

In West Vidarbha, sowing was delayed due to lack of rains | पश्चिम विर्दभात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

पश्चिम विर्दभात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

Next

अमरावती : विदर्भात १० जूनदरम्यान मान्सूनचे आगमन झाले असले तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. आठ दिवसापासून विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडत असल्याने यंदाच्या खरीप पेरण्या दमदार पावसाअभावी थबकल्या आहेत. कपाशीची काही प्रमाणात लगबग सुरू असली तरी सोयाबीनसाठी शेतकरी मात्र, पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

विभागात यंदाच्या खरिपासाठी ३२.२८ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यातुलनेत सध्या १,२५,१०० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. ही चार टक्केवारी आहे. विभागात यंदाच्या खरिपात ३२ लाख २९ हजार हेक्टरमध्ये खरिपाचे क्षेत्र प्रस्तावित आहे. यात अमरावती जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात ७.३४ लाख हेक्टर, अकोला ४.८३ लाख, वाशिम ४.०६ लाख व यवतमाळ जिल्ह्यात ९.१६ लाख हेक्टरमध्ये खरिपाचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार सद्यस्थितीत, बुलडाणा जिल्ह्यात १७ हजार ४०० हेक्टर, अकोला जिल्ह्यात ६ हजार ६००, वाशिम जिल्ह्यात १७ हजार, अमरावती जिल्ह्यात २ हजार ८०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात ८१,९०० हेक्टर मध्ये पेरणी झालेली आहे. विभागात आतापर्यंत १५८.६ मिमी पावसाची नोंद झालेली असली तरी सोयाबीनचे बियाणे महागडे असल्याने शेतकरी अद्याप पेरणीला धजावलेला नाही. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा न करता कपाशीच्या पेरण्या सुरू केल्या आहे.

बॉक्स

मृगाचे गाढव, आर्द्रात कोल्हा वाहन

यंदा ८ जून मृग नक्षत्र लागले. गाढव वाहन असलेल्या यानक्षत्रात फारशा पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांनी केली नव्हती. यात २१ जूनला आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. याचे वाहनदेखील कोल्हा आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचा लपंडाव राहणार असल्याचे शेतकरी सांगतात. हवामान विभागानेदेखील २३ जूनपर्यंत विखुरलेल्या स्वरुपात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मे महिन्यात हवामान विभागाद्वारा यंदा सरासरी इतका मान्सून असल्याचे जाहीर केले होते.

Web Title: In West Vidarbha, sowing was delayed due to lack of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.