एसीबीने हायकोर्टात दिलेल्या त्या प्रतिज्ञापत्राचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 05:36 AM2019-11-26T05:36:50+5:302019-11-26T05:37:29+5:30
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येत असलेल्या नऊ प्रकल्पांची उघड चौकशी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
अमरावती : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येत असलेल्या नऊ प्रकल्पांची उघड चौकशी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
या प्रकरणाविषयी एसीबीचे अमरावती येथील अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मंत्री, अभियंता व अन्य आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले जाऊ शकतील, असे नमूद केले होते.
सत्तास्थापनेच्या दोन दिवसांपूर्वी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या चौकशीबाबतचे सर्व दस्तावेज घेऊन तडकाफडकी मुंबईला बोलाविण्यात आले होते. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजीच्या पत्रात ह्यउघड चौकशी, निविदा प्रकरणाबाबत भविष्यात शासनाचे नियम, न्यायालयीन निर्देश अथवा आदेश पारित केल्यास, सदर निर्णयाच्या अधीन राहून आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी सुरू करण्यात येईलह्ण, या अटीवर ह्यनस्तीबंदह्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
विभागातील नऊ सिंचन प्रकल्पांच्या चौकशी अहवालाचे फाइल एसीबीने नस्तीबंद केल्याची माहिती नाही. यासंदर्भात कोणतेही कार्यालयीन आदेश आम्हाला नाहीत. एसीबीमार्फत सिंचन प्रकल्पांची चौकशी सुरू होती, हे मात्र खरे आहे.
- अनिल बहाद्दुरे,
मुख्य अभियंता,
जलसंपदा विभाग, अमरावती