बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:52+5:302021-05-27T04:12:52+5:30

गुणांना महत्त्व; व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी नियोजन हवे अमरावती : दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत सुरू असलेला गोंधळ विद्यार्थी व पालकांचा संभ्रम ...

What are the options for 12th standard exam? Governance in consideration; Student confusion | बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात

Next

गुणांना महत्त्व; व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी नियोजन हवे

अमरावती : दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत सुरू असलेला गोंधळ विद्यार्थी व पालकांचा संभ्रम वाढवित आहे. दरम्यान, आगामी काळात कोरोना महामारीचे संकट आणि तिसऱ्या लाटेत मुलांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेशिवाय मार्ग तपासून पाहावा, असे मत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड नुकत्याच पार पडलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीत मांडले. बहुतांश राज्यांशी बारावी परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे.मात्र, सध्याच्या कोरोनास्थितीत प्रत्यक्ष केंद्रावर परीक्षा घेणे अवघड असल्याचे मत मांडले. याचबरोबर मूल्यांकनाची एकसमान पद्धत असावी, अशी गरजही यावेळी मांडली.

बारावीच्या परीक्षेनंतर व्यावसायिक आणि पदवी अभ्यासक्रमाची दारे उघडणार असल्याने बारावीतील गुणांना महत्व असते. मात्र, यंदाची परिस्थिती पाहून केवळ महत्वाच्या मुख्य परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे, यासाठी मदत करावी, असा सूर पालक, विद्यार्थ्यांसह काही शिक्षकांमधून उमटत आहे. अनेकजण याच्याविरोधात असून, या परीक्षा व्हायलाच हव्यात, त्याशिवाय विद्यार्थ्यांना नवीन स्पर्धात्मक असणाऱ्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाची संधी देऊ नये, असे मत व्यक्त करीत आहेत.

---------------------

शिक्षक- तज्ञ्जांच्या प्रतिक्रिया

दहावीच्या परीक्षेप्रमाणे यंदाही बारावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात यावा आणि अंतर्गत मूल्यमापनाद्धारे पुढील प्रवेशासाठी मोकळे करावे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियाचा मार्ग मोकळा झाल्यास ते अडकून पडणार नाहीत.

- सुरेश मोलके, शिक्षक

-------

अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा यंदा मंडळाने घ्याव्यात आणि त्याप्रमाणे बारावी परीक्षांचे नियोजन करावे. कोराेना संसर्गाचा धोका जाणून आणि आरोग्य लक्षात घेऊन कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर त्यांच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा आयोजित करण्यात याव्यात, जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होऊ असेल. शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न करावा.

- गोपाल राऊत, प्राध्यापक

-----------------

अमरावती विभागात बारावीची एकूण विद्यार्थ्यांची संख्या : १,३७, ५६९

- मुले ७४,२३५

- मुली ६३,३३४

--------------------

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

सद्य:स्थितीत परीक्षा देणे म्हणजे कठीण पर्याय निवडण्यासारखे आहे. आमच्यामुळे कुटुंबाचे आरोग्य येऊ शकते,हा मासनिक ताण परीक्षेहूनही जास्त वाटत आहे. शिवाय ऑफलाईन परीक्षेदरम्यान संसर्गाची लागण झाली तर त्याची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

- नेहा रोकडे, बारावीची विद्यार्थिनी

-----------

यंदा परीक्षेची तयारी कितीही केली तरी कमीच वाटत आहे. हा ताण आहेच पण त्याहून ही परीक्षा कशा होणार, कुठल्या पद्धतीने होणार, याचा तणाव अधिक आहे. मागील दीड वर्षांपासून आम्ही ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अभ्यास करीत आहोत. ऑनलाईन एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेऊन लवकरच यातून मोकळे करावे, हीच अपेक्षा आहे.

- पराग वानखडे, बारावीचा विद्यार्थी

-------------------

गेल्या २ ते ३ महिन्यांपासून बारावी परीक्षांचा विषय रखडला आहे. परीक्षा घेण्यास आणखीन वेळ लावला तर पुढली प्रवेश परीक्षा आम्ही कधी देणार? कसा पुढच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणार? नवीन वर्षाच्या अभ्यासक्रमाला उशीर झाला तर पुढील वेळपत्रकही कोलमडणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या निर्णयाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची सुटका करावी.

- अर्चना साखरे, बारावीची विद्यार्थिनी

Web Title: What are the options for 12th standard exam? Governance in consideration; Student confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.