पोलिसांना कसले नियम, ठाण्यासमोर भररस्त्यावर होते वाहनांची पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:13+5:302021-07-01T04:11:13+5:30
अमरावती/ संदीप मानकर वाहतूक नियम मोडला, नो-पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्किंग केल्यास वाहतूक पोलीस व शहर पोलीस सामान्य नागरिकांवर कारवाईचा ...
अमरावती/ संदीप मानकर
वाहतूक नियम मोडला, नो-पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्किंग केल्यास वाहतूक पोलीस व शहर पोलीस सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारतात. मात्र, पोलिसांना कसले नियम, काही ठाण्याच्या बाहेर भरस्त्यावर वाहने पार्किंग केली जातात तर काही ठाण्यात नो- पार्किंगचे ज्या ठिकाणी फलक लागले आहेत. त्या ठिकाणी पोलिसांची व इतर नागरिकांची वाहने पार्किंग केलेली आढळून आली. यासंदर्भात बुधवारी ‘लोकमत’ने काही ठाण्यात जाऊन रिॲलिटी चेक केली असता, ‘दिव्याखालीच अंधार’ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. येथील सिटी कोतवाली ठाण्याच्या बाहेर अनेक वाहने रस्त्यावर उभी दिसली. तेथे नालीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सिटी कोतवाली ठाण्याच्या आतील परिसरात नो-पार्किंगचे फलक लावण्यात आले होते. तेथे काही पोलिसांचीच वाहने उभी असल्याने खऱ्या अर्थाने नियम पाळला जातो का? मग नियम मोडणाऱ्यांवर कोण कारवाई करणार? फ्रेजरपुरा ठाण्यात वाहने ठेवण्यासाठी एक शेड बांधण्यात आले. मात्र, ठाणेदारांच्या प्रवेशव्दारापर्यंत वाहने लावली जातात. गाडगेनगर ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर नियमबाह्य वाहने लावली गेली. तसेच शहर वाहतूक शाखेत तर नो- पार्किंग किंवा पार्किंगचे फलक कुठेही लावण्यात आले नव्हते. त्यामुळे कुणीही यावे अन् कुठेही वाहने उभी करून जावे, असा सावळागोंधळ तेथे दिसून आला.
शहरात नो- पार्किंग कारवाई
२०१९-
२०२०-
२०२१ मे पर्यंत-
पोलिसांना नियम लागू नाहीत का?
शहर वाहतूक शाखा
शहर वाहतूक शाखेच्यावतीने शहरात नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र शहर वाहतूक शाखेत नो- पार्किंगचे फलक नाही. तसेच अधिकृत पार्किंग कुठे आहे याचेसुद्धा फलक नाही. त्यामुळे कुणीही या व कुठेही वाहने उभी करा, अशी अवस्था आहे. त्यामुळे कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांना नियम नाही का, असा सवाल केला जात आहे.
बॉक्स
गाडगेनगर
गाडगेनगर ठाण्याच्या मु्ख्य प्रवेशव्दाराच्या बाहेर रस्त्यावर अनेकांची वाहने लावण्यात येतात. फुटपाथवर वाहने लावली जात असल्याने अडचण निर्माण होते. ठाण्याच्या आतल्या परिसरात वाहने उभी केली जाते. या ठिकाणी नो-पार्किंगचे फलक लावण्यात आले आहे. तेथे पोलीस कर्मचारी दुचाकी ठेवतात. अशीच परिस्थित शहरातील अन्य ठाण्यांचीसुद्धा आहे.
कोट
आहे.