संस्थेला अध्यक्षाचा लाभ काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:22 PM2017-09-02T23:22:08+5:302017-09-02T23:22:27+5:30

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मावळते अध्यक्ष अरूण शेळके हे संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे तिसºयांदा उमेदवार आहेत.

What is the benefit of the President to the organization? | संस्थेला अध्यक्षाचा लाभ काय ?

संस्थेला अध्यक्षाचा लाभ काय ?

Next
ठळक मुद्देश्री शिवाजी शिक्षण संस्था : सदस्यांचा सवाल, भ्रष्टाचाराचा वाढता आलेख रोखण्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मावळते अध्यक्ष अरूण शेळके हे संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे तिसºयांदा उमेदवार आहेत. दोन टर्म अध्यक्षपद भूषविलेल्या शेळके यांचा संस्थेला नेमका लाभ झाला तरी काय, असा प्रश्न संस्थेच्या मतदारांमध्ये मंथनाचा प्रमुख विषय झाला आहे.
डॉ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेली श्री शिवाजी शिक्षण संस्था ही राज्यातील दुसºया क्रमांकाची शिक्षण संस्था आहे. सुरुवातच दृढ संकल्पातून झालेल्या या संस्थेचा व्याप वटवृक्षाप्रमाणे पसरला. बहुजनांना सावली मिळावी, या हेतुने अनेकांनी मोकळ्या हाताने दान देऊन संस्थेची भरभराट करविली. शेळके हे शिक्षित आणि फ्रेश असल्यामुळे संस्थेच्या सर्वांगिण प्रगतीच्या विचाराने शिवपरीवाराने त्यांच्या हाती सुत्रे सोपविली होती; तथापि तेच मतदार आता निवड चुकल्याचे बोलू लागले आहेत.
उदात्त हेतुच्या संस्थेला काही देण्यासाठी सत्ताधिकाºयाचे वैचारीक अधिष्ठानही त्याच तोलामोलाचे असावे लागेल, असा मुद्दा आता शेळकेंच्या कार्यशैलीमुळे महत्त्वपूर्ण झाला आहे. चटकन आठवेल असे कुठलेही कार्य शेळकेंच्या काळात संस्थेसाठी झालेले नाही. संस्थेमुळे शेळकेंना काय मिळाले, याची चटकन आठवण व्हावी, असे अनेक मुद्दे मात्र आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेला शेळके यांनी दिले तरी काय, असा थेट सवाल त्यामुळेच उपस्थित होतो आहे.
संस्थेच्या सभासदांच्या मुलांना सदस्यत्त्व न देणे, भाऊसाहेबांच्या नावाला डाग लावणारे कार्य डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा ऋग्णालयात घडणे, महाविद्यालय बंद करण्याच्या हालचाली होणे, मर्जीतील लोकांचा भरणा करून त्यांना कामाविना वेतन देणे, एमबीबीएस, एमडीच्या जागांमधून कोट्यवधींचे व्यवहार होणे, मौल्यवान जागा निमूटपणे अतिक्रमित होऊ देणे या बाबी उघड आहेतच; तथापि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या अमरावतीतील घराची स्थितीही पालटू शकली नसल्याचा मुद्दा उपस्थित होतो आहे.
संस्थेच्या भरवशावर शेळके यांना मिळू शकलेले आणि शेळकेंच्या व्यक्तिमत्त्वातून संस्थेला मिळू शकलेले, अशा सर्व मुद्यांचा हिशेब मतदारांनी मांडणे सुरू केले आहे. 'अ‍ॅड.शेळके पॅनेल'ला त्यामुळेच अडसर ठरेल तो अध्यक्षपादाच्या उमेदवाराचाच!
परीवर्तन पॅनेलमध्ये राजकीय नेत्यांचा भरणा असल्यामुळे संस्थेत राजकारणाचा शिरकाव नको, हा अजेंडा मतदारांमध्ये अजूनही महत्त्वपूर्ण आहे. या पॅनेलचे चेहरे संस्थेच्या दृष्टीने परके आहेत. विकास पॅनेल, लोकमहर्षी पॅनेलचा प्रभाव मतदारांच्या मनावर अद्यापही बिंबू शकला नसल्याने त्यांना मार्ग अडचणीचा आहे. मतदार सर्वच पॅनेलचे विश्लेषण करीत असल्याने ना यावेळी लाट दिसत, ना 'आपला माणूस' हा मुद्दा जाणवत.

Web Title: What is the benefit of the President to the organization?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.