केवढे हे धाडस? ठेकेदारानेच ठोकले स्वच्छतागृहाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:12 PM2018-02-03T22:12:05+5:302018-02-03T22:13:52+5:30

महापालिका आवारातील स्वच्छतागृहाला कंत्राटदाराने कुलूप ठोकल्याने अधिकारी-कर्मचाºयांना असुविधेचा सामना करावा लागत आहे.

What is the courage? Locker to clean the toilet | केवढे हे धाडस? ठेकेदारानेच ठोकले स्वच्छतागृहाला कुलूप

केवढे हे धाडस? ठेकेदारानेच ठोकले स्वच्छतागृहाला कुलूप

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागाची मेहेरनजर : १७.२५ लाखांचा खर्च

आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिका आवारातील स्वच्छतागृहाला कंत्राटदाराने कुलूप ठोकल्याने अधिकारी-कर्मचाºयांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. या स्वच्छतागृहाच्या उभारणीवर महापालिका प्रशासनाने रेकार्डब्रेक १७ लाखांपेक्षा अधिकचा खर्च केला आहे. मागील अनेक महिन्यांपासून कुलूपबंद आधुनिक स्वच्छतागृहासाठी जाब विचारण्याचे धाडस बांधकाम विभाग करू शकला नाही. यावरून त्या कंत्राटदाराचा प्रशासनावर असलेला वचक लक्षात येईल. तथापि, कंत्राटदाराने काम पूर्ण केले व ते स्वच्छतागृह सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आल्याचा दावा महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांनी केला आहे.
उच्च न्यायालयाने बडगा उगारल्यानंतर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. ते कंत्राट आवडत्या जुझर सैफी या कंत्राटदाराला देण्यात आले. त्यासाठी १९ जानेवारी व २६ फेब्रुवारी २०१६ रोजी दोन करारनामे झाले. एकूण १७ लाख २४ हजार ४४७ रुपयांच्या या कामाचा १४ मार्च २०१६ रोजी कार्र्यारंभ आदेश देण्यात आला. सार्वजनिक शौचालय बांधकाम करारनाम्यानुसार चार महिन्यांत १३ जुलै २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात आले नाही. आता बांधकाम पूर्ण झाले असतानाही ते सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, बांधकाम पुर्ण झाले असून ते वापरासाठी तयार असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. महिन्याभरापूर्वी शौचालय वापरासाठी खुले करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कंत्राटदार जुझर सैफी यांनी त्यात त्यांच्या अन्य कामांवरील लोखंड व अन्य साहित्य भरून ठेवले व कुलूप ठोकले. शौचालयाचे बांधकाम फेब्रुवारी २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आल्याचा दावा अभियंता दिनेश हंबर्डे यांनी केला आहे. अंबादेवी रस्त्यावरील सैफी यांचे काम संपण्यातच जमा आहे. त्यामुळे महापालिका आवारातील सार्वजनिक शौचालय आपण लवकरच ‘हॅन्डओव्हर’ करून घेऊ, अशी माहिती हंबर्डे यांनी दिली आहे. काम पूर्ण करूनही अत्याधुनिक स्वच्छतागृह कुलूपबंद केल्याने कंत्राटदारावर असलेली प्रशासनाची मेहेरनजर अधोरेखित झाली आहे.
सदारांचे बोट स्वच्छता विभागाकडे
महापालिका आवारातील शौचालय कुलूपबंद असल्याचे सांगितले असता, सदार यांनी त्याबाबत आरोग्य विभागाकडे अंगुलीनिर्देश केला. ते शौचालय हस्तांतरित झाल्यानंतर स्वच्छता विभागाकडे त्याच्या देखभालीची जबाबदारी येईल. मात्र, ते सार्वजिनक वापरासाठी खुले करण्यापूर्वीच सदार यांनी अन्य विभागाकडे बोट दाखविल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
सारेच अनभिज्ञ...
कंत्राटदार सैफी यांनी या लाखमोलाच्या शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले; मात्र सार्वजनिक वापरासाठी खुले न करता त्याला कुलूप ठोकले. महापालिका आवारातील ते कुलूपबंद शौचालय प्रत्येकाच्या नजरेच्या टप्प्यात आहे. तथापि, या जगजाहीर बाबीपासून जीवन सदार यांच्यासह अन्य यंत्रणाही अनभिज्ञ आहेत.

Web Title: What is the courage? Locker to clean the toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.