काय सांगता? 160 वर्षांपूर्वी लुप्त झालेला भारतीय 'अंडीखाऊ' साप आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 07:00 PM2019-08-28T19:00:59+5:302019-08-28T19:01:06+5:30

स्थानिक चांगापूर येथील शिंदे नामक व्यक्तीच्या घराच्या आवारात बुधवारी दुपारी अडीच वाजता एक साप आढळून आलाय त्यांनी सर्पमित्र आकाश कुरळकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.

What do you say The missing Indian snake was found 160 years ago in amravati | काय सांगता? 160 वर्षांपूर्वी लुप्त झालेला भारतीय 'अंडीखाऊ' साप आढळला

काय सांगता? 160 वर्षांपूर्वी लुप्त झालेला भारतीय 'अंडीखाऊ' साप आढळला

Next

अमरावती - अतिशय दुर्मिळ असा भारतीय अंडीखाऊ साप चांगापूर येथील एका घराच्या परिसरात बुधवारी अडीचच्या सुमारास आढळून आला. संबंधितांच्या माहितीवरून सर्पमित्र आकाश कुरळकर यांनी सहकार्याच्या मदतीने त्याला पकडून जंगलात सोडले. मात्र, तब्बल 160 वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या प्रजातीचा साप आढळून आल्याने गावकऱ्यांनी पाहायला गर्दी केली होती. तसेच, गावात या सापाचीच चर्चा रंगली आहे.  

स्थानिक चांगापूर येथील शिंदे नामक व्यक्तीच्या घराच्या आवारात बुधवारी दुपारी अडीच वाजता एक साप आढळून आलाय त्यांनी सर्पमित्र आकाश कुरळकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. तात्काळ ते सहकाºयांसह चांगापूर स्थित शिंदे यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी सदर साप पकडला असता, त्याचे बारकाईने निरीक्षण केले. तो भारतीय अंडीखाऊ प्रजातीचा असल्याचे स्पष्ट झाले. अतिदुर्मिळ आणि निमविषारी म्हणून नोंद असलेला भारतीय अंडीखाऊ साप हा 160 वर्षांपूर्वी भारतातून लुप्त झाल्यापासून, तो अमरावती जिल्ह्यात सन 2005 मध्ये पहिल्यांदाच आढळल्याची नोंद आहे. हळूहळू तो विदर्भात सापडू लागला. त्याला इंग्रजीत इंडियन एगइटर असे नाव देण्यात आले आहे. कारण त्याचे मुख्य खाद्य अंडीच आहे. तो पक्षी, सरडा, पालींची अतिसंरक्षित, दुर्लभ अंडी खातो. त्याची गणना निमविषारी सापामध्ये होत असून, मानवाला दंश केल्यास ती व्यक्ती दारू, तंबाखू सेवन करणाऱ्यांपैकी असेल तर या सापाच्या विषाने केवळ भोवळ येते. परंतु ज्या व्यक्ती मादक पदार्थ व निकोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करीत नाहीत, अशांना चावा घेतल्यास कुठलाही परिणाम जाणवत नाही. सापाची सरासरी लांबी 2.5 फूट असते. त्याचे आयुष्य 25 ते 30 वर्षांचे आहे. साप पकडताना पवन बगल्ले, अनिकेत तलवारे, अभय माने, निर्मलेश भांबूरकर, गणेश पंडित, राहुल काळे यांनी सहकार्य केले.

मेळघाटात मात्र नोंद नाही
जिल्ह्याचे वनवैभव मानले जाणाऱ्या मेळघाटात वाघांपासून सरपटणारे विविध प्रजातींचे प्राणी आढळतात. मात्र, भारतीय अंडीखाऊ सापाची मेळघाटात अद्याप नोंद झालेली नसल्याचेही ते म्हणाले.
 

Web Title: What do you say The missing Indian snake was found 160 years ago in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.