आज संपणार मुदत, ३७ हजार टोकनचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:54 PM2018-05-14T23:54:50+5:302018-05-14T23:55:00+5:30

जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद्रांवर मंगळवार १५ मे पासून तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. १८ एप्रिलनंतर मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ खरेदीदार यंत्रणांनी उठविलाच नाही.

What is the expiry of the deadline, 37 thousand tokens? | आज संपणार मुदत, ३७ हजार टोकनचे काय?

आज संपणार मुदत, ३७ हजार टोकनचे काय?

Next
ठळक मुद्देखरेदीची मंदगतीच कारणीभूत : शेतकऱ्यांच्या घरी तीन लाख क्विंटल तूर पडून

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद्रांवर मंगळवार १५ मे पासून तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. १८ एप्रिलनंतर मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ खरेदीदार यंत्रणांनी उठविलाच नाही. याऊलट बारदाना, गोदाम नाही आदी सबबीखाली मोजणीची मंदगती कायम ठेवल्यानेच जिल्ह्यातील ३७ हजार टोकनधारक शेतकरी प्रतीक्षेत राहिले आहेत. आता शेतकरी खरीपपूर्व मशागत व लगेच पेरणीच्या कामात व्यस्त होणार असल्यानेच शासनाने वेळकाढू धोरणाचा अबलंब केल्याचा आरोप होत आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ तूर खरेदी केंद्रांवर बुधवार १८ एप्रिलपर्यंतच आॅनलाईन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश आहेत. त्यानंतर आठ दिवसांनी केंद्रांना १५ मुदतवाढ दिली असली तरी खरेदीदार यंत्रणांनी निव्वळ टाईमपास केला. त्यामुळेच आजतारखेला ३७ हजार ४४२ टोकनधारक शेतकºयांची किमान तीन लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.
जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १३ मेपर्यंत ५.२१ लाख क्विंटल तूर खरेदी झाली असली तरी किमान तीन लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. तूर खरेदीला १५ मे ची 'डेडलाइन' देण्यात आली. जिल्हा तूर उत्पादकतेच्या एकूण २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना दिलेत. यामुळे सद्यस्थितीत ७०,१९७ शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात ३२,७५५ शेतकºयांची ५.२१ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे.
यंदाच्या हंगामात साधारणपणे एक लाख १० हजार क्विंटल तुरीचे क्षेत्र होते व कृषी विभागाने हेक्टरी सरासरी उत्पादकता १५ क्विंटल जाहीर केली त्यानुसार जिल्ह्यात यंदा १५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापैकी सहा ते सात लाख क्विंटल तूर नाफेडच्या दिरंगाईमुळे खासगी बाजारात विकल्या गेली असली तरी अद्याप शेतकºयांच्या घरी किमान तीन लाख क्विंटल तूर पडून आहे. त्यामुळे या सर्व केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.

अशी आहे
केंद्रनिहाय नोंदणी
सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ८,८६३, अमरावती- ८,६१३, अंजनगाव सुर्जी- १,२९९, चांदूरबाजार- २,००७, चांदूर रेल्वे ४,७४३, दर्यापूर- ७,२२६, धारणी- ९३५, नांदगाव खंडेश्वर- ४,७३४, तिवसा- २,७८६, मोर्शी- ७,४१५, धामणगाव रेल्वे- ६,४६४ व वरूड तालुक्यात ७,५०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.

अशी आहे
केंद्रनिहाय खरेदी
सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ४८,४४७, अमरावती- ६९,६९३, अंजनगाव सुर्जी- ३४,४५२, चांदूरबाजार- ४०,४१५, चांदूररेल्वे- ४०,५२८, दर्यापूर- ७८,०७८, धारणी- ८,१५८, नांदगाव खंडेश्वर- २५,००२, तिवसा- २९,५२१, धामणगाव- ३४६६३, मोर्शी- ६५ हजार ८८ व वरुड तालुक्यात ४७,६४१ क्विंटल खरेदी केली आहे.

Web Title: What is the expiry of the deadline, 37 thousand tokens?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.