नांदुऱ्यातील समस्यांकडे मुख्यमंत्री देणार काय लक्ष?
By admin | Published: April 10, 2016 12:07 AM2016-04-10T00:07:23+5:302016-04-10T00:07:23+5:30
जिल्ह्यातील नांदुरा (बु) गाववासी समस्यांच्या विळख्यात असून झोपडपट्टीधारक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
नागरिकांचा सवाल : मूलभूत सुविधांचा अभाव
अमरावती : जिल्ह्यातील नांदुरा (बु) गाववासी समस्यांच्या विळख्यात असून झोपडपट्टीधारक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे समस्या निराकरणासाठी अनेकदा निवेदने सादर केली आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता नांदुऱ्यातील समस्यांकडे मुख्यमंत्री लक्ष देणार काय, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
अमरावतीहून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नांदुऱ्यात ३५ वर्षांपासून झोपडपट्टीवासी राहत आहेत. मात्र, त्याच्या मूलभूत सुविधाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या नागरिकांचे घरकूल यादीत नावे येतात. मात्र, त्यांच्या नावे जागा नसल्यामुळे त्यांना घरकुलापासून वंचीत ठेवल्या जात आहे. ईक्लासच्या जमिनीवर वसलेल्या या झोपडपट्टीत मजूर वर्ग राहत आहे, मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचा घरकुलाचा प्रश्न अधांतरी आहे. १० एप्रिल रोजी नांदुऱ्यात गोकुलम गौरक्षण संस्थेच्यावतीन अत्याधुनिक गौवंश चिकित्सालयाचा भूमिपूजन सोहळा आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री नांदुऱ्यातील नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देणार काय असा सवाल नागरिकांचा आहे.