हा कसला सन्मान? शिवसेनेचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:11 PM2017-10-31T23:11:33+5:302017-10-31T23:11:54+5:30
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकºयांच्या कर्जमाफीची योजना जाहीर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकºयांच्या कर्जमाफीची योजना जाहीर केली. या योजनेत शेतकºयांची सातत्याने अवहेलना होत असल्याने हा शेतकºयांचा सन्मान नव्हे, तर एकप्रकारे अवमान असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांनी केला. या योजनेमधील संभ्रम तत्काळ दूर करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना मंगळवारी देण्यात आले.
जिल्ह्यात चार लाख १५ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी एक लाख ९७ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्र्ज भरले आहेत. या सर्व शेतकºयांची दिवाळीपूर्वी कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. यापैकी केवळ २३४ शेतकºयांच्याच नावाची यादी घोषित करण्यात आली आहे. पात्र शेतकºयांची नावे हिरव्या यादीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा शेतकºयांचा अवमानच शासनाने केल्याचा आरोप बंड यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाने असलेल्या या योजनेत महाराजांच्या नावाला कुठेही डाग लागू नये, याची काळजी शासनाने घ्यावी, या योजनेविषयी शेतकºयांत प्रचंड नाराजी आल्याने प्रथम योजनेचा संभ्रम दूर करावा व शेतकºयांची तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांनी केली. यावेळी नाना नागमोते, श्याम देशमुख, आशिष धर्माळे, दत्तभाऊ ढोमणे, अमोल निस्ताने, राहूल माटोळे, स्वराज ठाकरे, गजानन डोंगरे, प्रज्वल देशमुख, श्याम कुचे, वसंत गौरखेडे, समादान देशमुख, शशिकांत भुगूल, अनिल नंदनवार, अरून भालेराव, सतीश धोटे, प्रशांत धोटे, सारंग देशमुख, योगेश गोवटे, शंतनु जुनघरे, आदी उपस्थित होते.