पवारांच्या भेटीमागचे रहस्य काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:07 PM2017-10-25T23:07:21+5:302017-10-25T23:09:24+5:30

What is the secret behind Pawar's meeting? | पवारांच्या भेटीमागचे रहस्य काय?

पवारांच्या भेटीमागचे रहस्य काय?

Next
ठळक मुद्देसुरेखा ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले : विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथे आयोजित सर्वपक्षीय सत्कार सोहळ्यानिमित्त आले असताना राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ज्या दोन निवडक घरी भेटी दिल्या, त्यातील एक भेट राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या सुरेखा ठाकरे यांच्या घरी होती. ही भेट नव्या राजकीय समीकरणांकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे.
राष्टÑवादीच्या चिन्हावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळलेल्या सुरेखा ठाकरे या शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, सेना यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यावर सुरेखा ठाकरे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश घेऊन अचलपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा राष्टÑवादी पक्षात प्रवेश केला. हल्ली त्यांच्याकडे महत्त्वाचे पद नसताना आणि पक्षांतर केले असतानाही इतर दिग्गजांच्या घरी जाण्याऐवजी शरद पवारांनी सुरेखा ठाकरे यांच्या घरी जाणे पसंत केल्याने अनेक राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. शरद पवारांसोबत यावेळी अनेक महत्त्वपूर्ण नेते होते. अरुण गुजराथी, अनिल देशमुख, हर्षवर्धन देशमुख, रमेश बंग, सुनील देशमुख, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप आदींचा त्यात समावेश होता. शरद पवार यांच्या सत्कार सोहळ्यात जराही प्रकाशझोतात न येणाºया सुरेखा ठाकरे यांच्या घरी स्वत: शरद पवार यांनी अशा दमदार रीतीने जावे, ही बाब राजकीय विश्लेषकांसाठी भविष्यातील घडामोडी खुणावणारी ठरली आहे.

Web Title: What is the secret behind Pawar's meeting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.