काय द्यावे तिला ? कसे करावे 'इम्प्रेस'?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:31 PM2019-02-13T23:31:33+5:302019-02-13T23:31:45+5:30
आजच्या दिवसाची प्रतिक्षा किती दिवसांपासून होती त्याला. मनोमन तिलाही. विविध आकर्षक भेटवस्तुंनी बाजार सजला आहे. पण त्याततले नेमके काय निवडावे जेणे करून ती इम्प्रेस होईल, या प्रश्नाच्या गुंत्यात अनेक तरूण प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला गुरटेले होते.
आम्ही भारतीय तसे संस्कृतीप्रिय; पण आपल्याच देशात, आपल्याच संस्कारांत लहानाचे मोठे झालेल्या तरुणांना मात्र परदेशी 'व्हॅलेंनटाईन्स डे' चुंबकाप्रमाणे आकर्षित करतो. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या बाजारपेठांमध्ये आजच्या प्रेमदिवसानिमित्त दाखल झालेल्या वस्तूंचा दमदार स्टॉक त्याचा पुरावाच होय..
अमरावती : आजच्या दिवसाची प्रतिक्षा किती दिवसांपासून होती त्याला. मनोमन तिलाही. विविध आकर्षक भेटवस्तुंनी बाजार सजला आहे. पण त्याततले नेमके काय निवडावे जेणे करून ती इम्प्रेस होईल, या प्रश्नाच्या गुंत्यात अनेक तरूण प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला गुरटेले होते.
गिफ्ट खरेदीसाठी तरुणाईच्या गर्दीने दुकाने फुलली आहे. आकर्षक भेटवस्तू, विविध प्रकारचे चॉकलेट्सनी बाजारपेठ सजली आहे. विशेषत्वाने गुलाब पुष्पांचा, त्यांच्या प्रतिकांचा वापर सर्वत्र आहेच. त्यामुळे फुलविक्रेत्यांनीही रोजच्या तुलनेत जोमदार तयारी केली आहे.
शहरातील महत्त्वाच्या कॅफेसह काही हॉटेल्समध्ये 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यासाठी काही तरुणांंनी नियोजनही केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वास्तव्य असणाऱ्या भागांमध्ये बघावे तिकडे तरुणांचे जत्थे दिसतात. पंचवटी चौक परिसर, मुख्य बाजारपेठ, फुलांची दुकाने तरुणाईने बहरली होती. त्याला जशी तिच्यासाठी व्यक्त होण्याची इच्छा तशीच तिलाही त्याने व्यक्त व्हावे अशी छुपी प्रतीक्षा प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला जाणवली.
चिनच्या 'मेसेज बॉक्स'ला पसंती
दरवर्षी 'व्हॅलेंटाईन डे'ला नवीन भेट वस्तू लॉन्च होते. त्याचप्रमाणे यावर्षी मेसेज बॉक्स हे स्वस्त आणि मस्त मन:पूर्वक संदेश देणारे गिफ्त बाजारपेठेत दाखल झाले आहे. एका छोट्याशा बाटलीत आकर्षक रंग व कापडाच्या विशिष्ट आकारात कोरा कागद गुंडाळून ती बॉटल गिफ्ट म्हणून देता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात'खलिता'द्वारे मेसेज पोहचविण्याची प्रथा होती. त्याची प्रचिती या माध्यमातून येणार आहे. मुलीला प्रेमाचा संदेश देण्याचा आधुनिक काळातील हा 'खलिता' चीनने साकारला असून, या वस्तू अगदी खिशाला परवडेल, अशा दरात उपलब्ध असल्याने या गिफ्टकडे तरुणाई आकर्षित होऊ लागली आहे.
अंबानगरीतही पोहोचली
आॅनलाईन पुष्पवितरण सेवा
दिल्ली, मुंबई, पुणे, अशा लांब शहरात व विदेशात वास्तव्यास असलेले नातेवाईक त्यांच्या आप्तेष्टांना प्रत्यक्ष 'व्हॅलेंटाईन डे'ला फुल देऊ शकत नाही. अशांसाठी तंत्रज्ञानाच्या युगात अनेक अॅप निर्माण झाले आहेत. अमरावतीतही आता हे तंत्राान पोहोचले आहे. चार फुलविक्रेत्यांकडे तशी सोय आहे. आॅनलाईन आॅर्डरद्वारे संबंधितांना 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त पुष्प पाहोविले जातात. १०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत त्यासाठीचा खर्च येत असल्याचे पुष्पविक्रत्यांनी लोकमतला सांगितले.