गीतातून झळकला ‘व्हॉट्स अॅप फिव्हर’
By admin | Published: January 8, 2015 10:46 PM2015-01-08T22:46:34+5:302015-01-08T22:46:34+5:30
सध्या ‘व्हॉट्स अॅप’चा फिव्हर घराघरात धुमाकूळ घालतोय. अमरावती शहरातील काही प्रतिभावान युवकांनी ‘व्हॉट्स अॅप’ची वाढती क्रेझ शब्दबध्द केली आहे. व्हॉट्स अॅपप्रेमींसाठी हे
वैभव बाबरेकर - अमरावती
अमरावती : सध्या ‘व्हॉट्स अॅप’चा फिव्हर घराघरात धुमाकूळ घालतोय. अमरावती शहरातील काही प्रतिभावान युवकांनी ‘व्हॉट्स अॅप’ची वाढती क्रेझ शब्दबध्द केली आहे. व्हॉट्स अॅपप्रेमींसाठी हे गीत‘सर्च कर डॉट कॉम’वर उपलब्ध आहे.हे गीत सध्या अमरावतीकरांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.
शहरातील तरुणांमधील सुप्त गुणांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने काही युवकांनी ‘सर्च कर डॉट कॉम’च्या माध्यमातून विविध उपक्रम सुरु केले आहेत. सध्याच्या काळात व्हॉट्स अॅपची वाढती क्रेझ बघता शहरातील काही युवकांनी अस्सल गावरान भाषेत गीत रचले आहे. मयूर गेडाम व अमितसिंग नहाटा यांनी हे गीत गायले आहे. ‘सर्च कर डॉट कॉम’वर जाऊन हे गाणे ऐकता येवू शकते. सरत्या वर्षाला म्हणजे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. हे रॅप साँग असून ते तयार करण्यासाठी वैभव वानखडे, रजत काळे, सुमीत देशमुख, साकेत देशमुख यांनी प्रयत्न केले. हे गाणे ‘सर्च कर डॉट कॉम’वर जाऊन व ठरवून दिलेला ई-मेल करुन ऐकता येते. केवळ शहरातच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही या व्हॉट्स अॅप फिव्हरच्या गाण्याला पसंती दिली जात आहे. तरूणाईच्या पचनी पडणारी गावरान भाषेतील शब्दरचना असलेले हे गीत लोकप्रिय झाले आहे.