मुलांच्या मनात काय? असाईनमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:45+5:302021-09-25T04:11:45+5:30
मुलांच्या मनात काय? मी माझ्या मुलाला शिकवून सवरून मोठे केले. त्याच्या नोकरीसाठी पायपीट केली. म्हणून त्याचा काहीसा खर्च मुलीकडून ...
मुलांच्या मनात काय? मी माझ्या मुलाला शिकवून सवरून मोठे केले. त्याच्या नोकरीसाठी पायपीट केली. म्हणून त्याचा काहीसा खर्च मुलीकडून घ्यायचा, त्याला स्त्रीधनाचे गोंडस नाव द्यायचे, असा प्रकार अनेक पालकांकडून केला जातो. त्याला धरबंद घालणे मुलांच्याच हातात आहे.
मनीष रेचे, अमरावती
///////
मी हुंडा घेणार नाही, का घेऊ, मुुलीचे पालक तिच्या लग्नात खर्च करतात, ते पुरेसे नाही का? ही मानसिकता अंगीकारण्याची नितांत गरज आहे. पालकांची मानसिकता तरुण पाल्यच बदलवू शकतात.
- पीयूष पडोळे, अमरावती
///////////
मुलांच्या पालकांना काय वाटते?
नोकरीवाला मुलगा नोकरदार मुलीला पसंती देतो. वधूपक्ष धूमधडाक्यात लग्न करतो. लग्नातील स्त्रीधन शेवटी मुलीच्याच अंगावर राहते. मग, ते वधूपक्ष स्वेच्छेने देत असल्यास बिघडले कुठे?
एक पालक
//////////
पालकांनीही हुंड्याचा प्रखर विरोध करायला हवा. आजची तरुणाईदेखील हुंड्याच्या भानगडीत फारशी पडत नाही, असा माझा अनुभव आहे. स्त्रीधनाचा वापर वा मागणी मोठ्या रकमेच्या हुंड्यात व्हायला नको.
एक पालक
///////////
मुलींच्या मनात काय?
हुंड्याच्या मागणीमुळे अनेकींचे लग्न जुळेनासे झाले आहे. कित्येक शेतकरी, कामकरी हुंड्यापायी मुलीचे लग्न करू न शकल्याने आत्महत्या करीत आहेत. मुलींच्या लग्नाच्या विवंचनेत वधुपित्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी चिंताजनक आहे.
एक मुलगी
////////////
हुंड्यासाठी छळ झाल्याची तक्रार घेऊन गेल्यास आधी महिला कक्षाकडून समुपदेशन केले जाते. समेट घडवून न आल्यास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली जाते. गुन्हा नोंदविला जातो. पण, संसार तुटतो त्याचे काय? हुंडा मागणाऱ्या व हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांनी विचार करावा.
एक मुलगी
////////////
मुलींच्या पालकांना काय वाटते?
मुलांकडून स्त्रीधनाच्या नावावर मोठी रक्कम मागितली जाते. अनेकांकडून तर वाहनेदेखील मागितली जातात. ही प्रथा थांबविणे तरुणाईच्या हातात आहे.
/////////
शेतकरी आधीच हतबल झाला आहे. वरपक्षाकडून होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी तो कर्जबाजारी होतो. ते कर्ज फेडता न आल्याने तो आत्मघात करवून घेतो, हे आजचे वास्तव आहे.
//////////////
शहर आयुक्तालयात हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी
२०१८ : १८३
२०१९ : ११०
२०२० : ७२
२०२१ : ५६