'अॅक्शन प्लॅन'ची अंमलबजावणी केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:56 PM2017-11-12T22:56:21+5:302017-11-12T22:56:40+5:30
शहरात धूलिकण, वायू व ध्वनीप्रदूषणावर उपाययोजनेसाठी महापालिकेने 'अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात धूलिकण, वायू व ध्वनीप्रदूषणावर उपाययोजनेसाठी महापालिकेने 'अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केव्हा होणार, की ती केवळ कागदोपत्रीच राहणार, याबाबत अमरावकरांमध्ये शंका निर्माण होत आहे. उपाययोजनेसंदर्भात बैठक होऊन चार दिवस ओलांडून गेलेत, मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही कामाला हात लागला नाही.
अमरावती महापालिकेकडून सन २०१६-१७ चा पर्यावरण स्थिती अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात हवेची गुणवत्ता दुय्यम होत असल्याचे आढळले असून हवेत धूलिकण (आरएसपीएम)चे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा अधिक वाढल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे ध्वनीप्रदूषण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. धूलिकण व प्रदूषणाच्या प्रकोपामुळे अमरावतीकरांचे आयुष्यमान घटत आहे. नागरिकांना आरोग्यविषय समस्या जाणवू लागल्या आहेत. श्वसनाचे आजार वाढले आहे. असे अनेक दुष्पपरिणाम होत असतानाही प्रशासनाने अद्यापपर्यंत ही बाब गांभीर्याने घेतली नाही. धूलिकणांचा प्रकोप अमरावतीकरांवर घातक परिणाम करीत असल्याचे वृत्त मालिका 'लोकमत'ने लोकदरबारी मांडताच महापालिका प्रशासनाने दखल घेतली. उपाययोजनांसाठी संबधीत विभागांची बैठकी बोलावून अधिकाºयांनी मंथन व चर्चा केली. अॅक्शन प्लॅन तयार झाला. यासंबंधाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना सूचित करण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकाही कामाला सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे.
अॅक्शन प्लॅनमधील उपाययोजना
महापालिकेतील बैठकीत दिलेल्या सूचनांमध्ये कन्स्ट्रक्शन अॅन्ड डिमॉलिशन रुल्स २०१६ ची प्रभावी अमंलबजावणी सर्व विभागाने करणे आवश्यक आहे. विकासकामे सुरू असताना बांधकाम साहित्य हाताळणी, वाहून नेणे, चाळणे, यापासून धुलीकण उडू नये, यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचे फवारे मारणे, पडदी, बॅरीकेटींग आणि डस्ट सप्रेशन युनिटचा वापर करून धुळ उडणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगितले. कचरा (बायोमास) जाळण्यास बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रस्त्यांच्या रुदींकरणाची कारवाई करणे, रस्त्यावर खड्डे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, खडतर रोडवर कोटींग करून पून:बांधणी करण्याच्या सुचीत करण्यात आले आहे. मात्र, अद्यापर्यंत यापैकी एकाही उपाययोजनांची अॅक्शन घेतल्या गेली नसल्याचे आढळून येत आहे.
स्वीपिंग मशीनचा वापर केव्हा ?
शहारातील उड्डाणपूल व रस्त्यांच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात हवेत धूलीकण उडत असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. धूलिकणांवर उपाययोजनेसाठी स्वीपिंग मश्ीानद्वारे साफसफाई करण्याचे निर्देश महापालिकेतील बैठकीत देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत स्वीपिंग मशीनचा उपयोग करण्यात आलेला नाही.