देवमाळीच्या गणेश मंगलम्वर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:48 PM2017-10-27T23:48:18+5:302017-10-27T23:48:35+5:30

परतवाडा नजीकच्या देवमाळी ग्रामसभेत येथील गणेश मंगल कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचा ठपका ठेवत ते बंद करण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वी सर्वानुमते घेण्यात आला.

When the action taken at Ganeshmani Ganeshmala temple? | देवमाळीच्या गणेश मंगलम्वर कारवाई केव्हा?

देवमाळीच्या गणेश मंगलम्वर कारवाई केव्हा?

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामपंचायतीचा ठराव : जिल्हाधिकाºयांना निवेदन, रहिवासी भागातील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : परतवाडा नजीकच्या देवमाळी ग्रामसभेत येथील गणेश मंगल कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचा ठपका ठेवत ते बंद करण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वी सर्वानुमते घेण्यात आला. मात्र, वारंवार स्मरणपत्रे व जिल्हाधिकाºयांचा आदेश असतानासुद्धा अद्याप कारवाई झाली नाही. रहिवासी भागात असलेल्या या मंगल कार्यालयाचे बांधकाम अवैध आहे.
गणेश मंगल कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव १० फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या तहकूब ग्रामसभेत विषय क्रमांक ९ नुसार घेण्यात आला होता. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी गौरीनंदन काथेकर होते. सभेला सरपंच विद्या चौधरी, अचलपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश सरोदे, ईश्वरदास सातंगे, विनायक किचंबरे, ग्रामसचिव रमेश कावडकर आदी उपस्थित होते. ग्रामसभेला उपस्थित असलेल्या अनेकांनी मंगल कार्यालयासंदर्भात अनेक आक्षेप नोंदविले. अखेर आवाजी मतदानाने हे मंगल कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, असा ठराव बहुमताने पारित करण्यात आला.
ग्रामपंचायत अधिनियम कलम ५३ (२-अ) नुसार जिल्हाधिकाºयांकडे कार्यवाहीच्या परवानगीसाठी अर्ज सादर करण्यात आला. वारंवार स्मरणपत्र पाठविल्यावर यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने याची तक्रार थेट राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना २६ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आली. यानंतर १९ मे २०१७ रोजी ४५ हून अधिक स्थानिकांनी स्वाक्षºया केलेले स्मरणपत्र पाठविण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी ५ जुलै रोजी कारवाईचे आदेश अचलपूर तहसीलदारांना दिले. तथापि, कोणतीही कार्यवाही झाली नाही. याप्रकरणी कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आठ प्लॉट एकत्र
गणेश मंगल कार्यालयासाठी प्लॉट क्रमांक १, २, ३, ४ व १९, २०, २१, २२ यांना एकत्र करून ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीच्या तिप्पट बांधकाम केले. वास्तविक, रहिवासी जागेचा व्यावसायिक कामासाठी नियमबाह्य वापर केला जात आहे. याशिवाय मंगल कार्यालयासाठी आवश्यक परवानगी घेतल्याची नोंद नाही, असे ग्रामपंचायतीच्या ठरावात नमूद आहे.

मंगल कार्यालयावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. ती का केली जात नाही, हे समजण्यापलीकडे आहे. परिसरातील नागरिकांना हे सभागृह येथे नको आहे.
- नरेंद्र राईकवार, नागरिक

गणेश मंगलम्संदर्भात जिल्हाधिकाºयांचे पत्र मिळाले. अनधिकृत अकृषक जमिनीचा वापर केल्याप्रकरणी ५ एप्रिल २०१७ रोजी २८,६३१ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
- निर्भय जैन,
तहसीलदार, अचलपूर
 

नागरिकांना होतो त्रास
मंगल कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी आहे, असा दावा संचालकांनी केला; मात्र रात्री उशिरापर्यंत चालणारे डीजे, ढोल, बँड, फटाके, आतषबाजी व रस्त्यावर वाहने पार्क करीत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. समारंभानंतर शिल्लक राहिलेल्या व शिळ्या अन्नाची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
 

Web Title: When the action taken at Ganeshmani Ganeshmala temple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.