राष्ट्रसंतांच्या शाळेचा कायापालट केव्हा?
By admin | Published: February 3, 2015 10:49 PM2015-02-03T22:49:01+5:302015-02-03T22:49:01+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीक्षेत्र वरखेड येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळेचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शाळा
ज्ञानेश्वर बेलूरकर - वरखेड
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीक्षेत्र वरखेड येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळेचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मनगटे व विद्यार्थी पालकांनी केली आहे.
तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र वरखेड ही संतांची पवित्र भूमी म्हणून परिचित आहे. गावात समर्थ आडकुजी महाराजांची समाधी, राष्ट्रसंतांच्या मातोश्री पुष्पमंजुळा माता यांचे वास्तव्य व वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून या गावाची ओळख आहे.
सन १ आॅगस्ट १८७६ मध्ये येथील प्राथमिक मराठी शाळेची स्थापना झाली. या शाळेत तुकडोजी महाराजांनी सन १९२० या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश केला. ३ एप्रिल १९२३ ला इयत्ता ४थी पर्यंत प्राथमिक शिक्षक घेतले. तुकडोजी महाराज ज्या खोलीत बसवाचे त्या ठिकाणी सध्या विद्यार्थ्यांकरिता पोषण आहार शिजविण्यात येते. अशा या महत्त्वपूर्ण स्थानाचे शासनाने ऐतिहासिक महत्त्व जाणून बांधकाम करुन तुकडोजी महाराजांचे विद्येचे स्थान म्हणून गुरुदेवभक्तांकरिता परिचित राहिले असते. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून जीवन शिक्षण या एकोणविसाव्या अध्यायात्त शिक्षणाचे महत्त्व किती, याचे स्पष्टीकरण केले आहे.
या जि.प. प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता १ली ते ७वी पर्यंतच्या ७ तुकड्या आहेत. मुले ७३ व मुली ६० असे १३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील पाच वर्गखोल्या जीर्णावस्थेत आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे.
या शाळेच्या छतावरील इंग्रजी कवेलू अद्यापही कायम आहेत. माकडांचा नेहमीच हौदोस असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावे कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने शाळेचे बांधकाम करण्याकरिता ठराव घेऊन शासन दरबारी प्रस्ताव सादर केला. परंतु शासनाकडून केराची टोपलीच दाखविल्याचे समजते. या ऐतिहासिक शाळेचे बांधकाम व्हावे, असे कोणत्याच लोकप्रतिनिधीला वाटत नसल्याने शाळेची स्थिती दयनीय झाली आहे.
नुकतीच सभापती अर्चना वेरुळकर व गटविकास अधिकारी किशोर काळे यांनी शाळेची पाहणी केली.
शाळेचे बांधकाम तत्काळ व्हावे याकरिता ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बेलूरकर, माजी उपसरपंच दिलीप कडू, संदीप मनगटे, राजेंद्र कांडलकर, माजी सरपंच विलास होले, गणेश कोहरे, उपसरपंच सदाशिव मेश्राम, प्रगती अग्रवाल, विनोद अग्रवाल, मनोहर अमझरे, मोहन अग्रवाल, अशोक इंगळे यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.