शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला लगाम केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:39 PM2017-11-15T23:39:54+5:302017-11-15T23:40:24+5:30

When the childish children's inhuman traffic? | शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला लगाम केव्हा?

शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला लगाम केव्हा?

Next
ठळक मुद्देवयोवृद्ध, महिला वैतागल्या : पालकांनो, मुलांना आवरा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हसत-खेळत गप्पा करत वाहनाच्या वर्दळीतून मार्ग काढणाऱ्या शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला कोण आवरणार, असा प्रश्न सध्या शहरात निर्माण झाला आहे. या बालवयातील मुलांच्या भरधाव वाहनांना पाहून वयोवृद्ध किंवा महिला अक्षरशा वैतागल्या आहेत. हा सर्व प्रकार दसरा मैदान मार्गावरील रवि नगर चौकात सर्वाधिक पहायला मिळत आहे.
शहरात वाहनांची वर्दळ बघता कधी अपघात घडेल, हे सांगता येत नाही. 'नजर हटी दुर्घटना घटी, अशीच स्थिती शहराची आहे. अशा स्थितीत शाळकरी मुलांची बेभान वाहतूक अपघाताला आमंत्रण देत आहे. या मुलांकडे परवाना नसतानाही पालकवर्ग त्यांच्या हाती वाहन देत आहे. मात्र, ही मुले शाळेत जाताना व घरी परतताना वाहने व्यवस्थित चालवितात का, हे पाहण्याची तसदीही पालक घेत नाहीत. एकाच दुचाकीवर तिब्बल सिट भरधाव वाहन चालविण्यातही हे शाळकरी मुले पटाईत आहेत. या मुलांना अपघात घडण्याची थोडीही भीती उरली नसल्याचे त्यांच्या चेहºयावरून दिसून येते. वाहनांची शांततेत वर्दळ सुरू असताना अचानक एक दुचाकी भरधाव वेगाने जाते आणि अन्य वाहनांना कट मारत पुढे जात असल्याचे किस्से दररोज शहरात पाहायला मिळत आहे. मात्र, कट मारून पुढे जाणाऱ्या या शाळकरी मुलांना मागील वाहनाधारक किती धाबरला किंवा तो खाली पडला का, हे पाहण्याससुद्धा फुरसत नसते. वाहनांना कट मारल्यानंतरही जोरजोºयात हसत शाळकरी मुले भरधाव निघून जातात. दररोज घडणारे हे प्रकार अनेकांच्या निदर्शनास येतात. अनेक वाहनचालक मुलांना हटकतातसुद्धा. मात्र, त्यांची क्षुल्लकशी दखलसुद्धा हे शाळकरी मुले घेत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या शाळकरी मुलांची बेभान वाहतूक एखादी मोठ्या घटनेला आमंत्रण देऊ शकते. त्यांना वेळेव्त लगाम लावणे आता गरजेचे झाले आहे.
दसरा मैदान मार्गावर वृद्ध कोसळला
एक वृद्ध मंगळवारी सायंकाळी दसरा मैदान ते रविनगर मार्गावरून दुचाकी घेऊन हळूहळू जात होते. अचानक भरधाव तिब्बल सिट बसलेले काही शाळकरी मुले त्या वृद्धाच्या दुचाकीला कट मारून पुढे निघाले. अचानक घडलेला हा प्रकार पाहून त्या वृद्धाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळले. मात्र, भरधाव पुढे गेलेल्या त्या शाळकरी मुलांना ते वृद्ध खाली पडल्याचे काही देण-घेण नसल्याचे दिसून आले. असे प्रकार दररोज शहरात घडत आहेत.

पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये. ती अपघाताला आमंत्रण देणारी ठरू शकते. त्याच्या वाहतुकीस बे्रक लावण्याचे प्रयत्न करू. त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात येईल.
- अर्जुन ठोसरे,
पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: When the childish children's inhuman traffic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.