कच्च्या नालांची सफाई केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:29+5:302021-07-19T04:10:29+5:30
अमरावती : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही शहरातल्या कच्च्या नाल्यांची सफाई कंत्राटदारांनी केलेली नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याचा धोका असल्याचे नागरिकांनी ...
अमरावती : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही शहरातल्या कच्च्या नाल्यांची सफाई कंत्राटदारांनी केलेली नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याचा धोका असल्याचे नागरिकांनी सांगितले.
------------------------------------------
जिल्ह्यात १२३ ॲक्टिव्ह रुग्ण
(फोटो)
अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने रुग्णसंख्येतही कमी येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत १२३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ६३ रुग्ण रुग्णालयात, तर अन्य होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-------------------------------------
(फोटो/लोगो)
महापालिकेची आमसभा मंगळवारी
अमरावती : महापालिकेची जुलै महिन्याची आमसभा २० तारखेला व्हीसीद्वारे होत आहे. कोरोनाकाळात काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नियमित स्वरूपात कामावर घेण्याविषयी चर्चा होणार आहे.
----------------------------------------
२१ नंतर दमदार पाऊस
अममरावती : मान्सूनने ९ जुलैपासून कमबॅक केले आहे. तीन दिवसांपासून विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडत असला तरी २१ तारखेपासून दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.
---------------------------------------
पुष्यचा ‘घोडा’ उधळणार
अमरावती : पावसाचे पुष्य नक्षत्र सोमवारपासून सुरू होत आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा आहे व आता दमदार पावसाची शक्यता असल्याने घोडा उधळणार असल्याचे ज्येष्ठ सांगतात.
-------------------------------------------
अर्जुननगरातील रस्ता उखडला
अमरावती : अर्जुननगर बगीचालगतचा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुलर्क्ष असल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
----------------------------------------