सायन्स कोअर मैदानाला संरक्षणभिंत, सौंदर्यीकरण केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:01:05+5:30

शहराच्या मध्यभागी असलेले हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी बलत्कार, खून यांसारख्या घटनाही घडल्या आहेत. आता तर अवैध वाहतुकीचा ठिय्या तेथे पडला आहे. कचऱ्याचे ढीग लागले आहेत. या सर्व प्रकारांमुळे मैदानाचे गतवैभव लयास गेले आहे.

When is the conservation, beautification of science core ground? | सायन्स कोअर मैदानाला संरक्षणभिंत, सौंदर्यीकरण केव्हा?

सायन्स कोअर मैदानाला संरक्षणभिंत, सौंदर्यीकरण केव्हा?

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे दुर्लक्ष : जिल्हा वार्षिक योजनेतून १.६० कोटींचा निधी उपलब्ध; झेडपीचीही ४० लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या हृदयस्थानी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर मैदानाची दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी चालणारे अवैध प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा व अन्य उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे १ कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. संरक्षणभिंतीच्या बांधकामाकरिता जिल्हा परिषदेने ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. परंतु, निधी उपलब्ध असतानाही सायन्स कोअर मैदानाच्या कायापालटाची कामे सुरू करण्यास जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे.
शहराच्या मध्यभागी असलेले हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी बलत्कार, खून यांसारख्या घटनाही घडल्या आहेत. आता तर अवैध वाहतुकीचा ठिय्या तेथे पडला आहे. कचऱ्याचे ढीग लागले आहेत. या सर्व प्रकारांमुळे मैदानाचे गतवैभव लयास गेले आहे. त्यामुळे सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा तसेच या परिसरात स्वच्छता राखण्याच्या अनुषंगाने उपाययोजनांसाठी सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने तत्कालीन आमदार वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. याची दखल घेत जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाने मैदानाच्या सुरक्षितेसाठी ४० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. हा प्रस्ताव शिक्षण व बांधकाम समिती आणि यानंतर प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला. त्याला स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. त्यानुसार सायन्स कोअर मैदानाच्या सुरक्षाभिंतीचे कामांसाठी लगेच निविदा काढून संपूर्ण मैदानाची भिंत अडीच फुटांनी उंच करून त्यावर तारेचे कुंपण, दोन प्रवेशद्वार, सीसीटीव्ही कॅ मेरे, हायमास्ट लाइट व सुरक्षारक्षक या उपाययोजना केल्या जाणार होत्या. परंतु, कामाची ना निविदा निघाली, ना काम सुरू झाले. उलट कामासाठी मैदानाच्या भिंती पाडून ठेवल्या आहेत. प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार, याचा थांगपत्ता नाही. जिल्हा परिषदेचे व पदाधिकाऱ्यांचे याकडे असलेले दुर्लक्ष याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी या विषयात जिल्हाधिकाºयांना पत्र दिले. निधी असताना कामे सुरू होत नसल्याची नाराजी व्यक्त करीत, ती सुरू करण्याची मागणी केली आहे.

डीपीसीकडून १ कोटी ६० लाखांचा निधी
सायन्स कोअर मैदानाच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी ३१ मे रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक ीत सुमारे १ कोटी ६० लाखांचा निधी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आला. यापैकी एक कोटी रुपये जिल्हा परिषद बांधकाम विभागाला प्राप्त झाले. यामधून या मैदानात जवळपास ४०० मीटर ट्रॅक, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षा भिंतीसाठी चेनलिंक फेन्सिंग, चहुबाजूंनी हायमास्ट लाइट,चिल्ड्रेन पार्क व अन्य कामांद्वारे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्याचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही.

सायन्स कोअर मैदानाच्या संरक्षणभिंतीसह सौंदयीकरणाची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. सदर कामांच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. येत्या काही दिवसांत निविदा काढून कामे सुरू केली जातील.
- प्रशांत गावंडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग
 

Web Title: When is the conservation, beautification of science core ground?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.