बेलोरा विमानतळाचे डिझाईन, प्लॅनिंग केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:18 PM2018-06-10T23:18:29+5:302018-06-10T23:19:01+5:30

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण होऊन सहा महिने झाले. तथापि, संरचना (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात निविदा प्रक्रिया मंत्रालयस्तरावर प्रलंबित असल्याने विमानतळाच्या विकासाचा गती मिळत नाही, हे वास्तव आहे.

When did Bellora Airport design, planning? | बेलोरा विमानतळाचे डिझाईन, प्लॅनिंग केव्हा?

बेलोरा विमानतळाचे डिझाईन, प्लॅनिंग केव्हा?

Next
ठळक मुद्देमंत्रालय स्तरावर निविदा प्रलंबित : ओएलएस सर्वेक्षणानंतरही विकासाला गती नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण होऊन सहा महिने झाले. तथापि, संरचना (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात निविदा प्रक्रिया मंत्रालयस्तरावर प्रलंबित असल्याने विमानतळाच्या विकासाचा गती मिळत नाही, हे वास्तव आहे.
बेलोरा विमानतळाच्या विकासाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याकरिता ७५ कोटी रुपयेदेखील मंजूर केले आहे. विमानतळाचे विकासाचे नवे धोरण ठरविताना ७५ पैकी १५ कोटी रूपयांचा पहिला टप्पा वितरीत केला आहे. त्याअनुषंगाने बेलोरा विमानतळाचे जानेवारी २०१८ मध्ये ओएलएस सर्वेक्षण करण्यात आले असून, तसा वस्तुनिष्ठ अहवाल केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. ओएलएस सर्वेक्षण आटोपल्यानंतर विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिंगसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून कन्सल्टन्सी नेमणे आवश्यक आहे. मात्र, ही प्रक्रिया राज्याच्या सामान्य प्रशासन मंत्रालयात प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे. विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण, संरक्षणभिंतीचे काम, अमरावती-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाला टी-पॉइंटवर जोडणारा जळू ते बेलोरा वळणमार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, आता विमानतळ विकासकामांसाठी डिझाइन, प्लॅनिंगला मान्यता मिळविणे अनिवार्य आहे. एकदा कन्सल्टन्सीची नेमणूक झाली की, येत्या काळात कोणती विकासकामे प्राधान्याने करावयाची ही बाब स्पष्ट होईल. परंतु, विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिंगसाठी निविदा प्रक्रिया मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याने ही फाइल पुढे कधी सरकणार, याबाबत संभ्रम कायम आहे.
ना. प्रवीण पोटे, सुनील देशमुखांसाठी कसोटी
चंद्रपूर येथे नव्याने मंजूर झालेल्या विमानतळासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार भरभरून निधी खेचून नेत आहेत. मात्र, बेलोरा विमानतळावर पाहिजे त्या प्रमाणात विकासकामांना गती मिळाली नाही. विमानतळाची विकासकामे पूर्णत्वास आणून येथून विमानांचे टेकआॅफ व लँडिंग ही पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांच्याकरिता कसोटी आहे.
शासनाकडे प्रस्तावित विकासकामांची यादी
बेलोरा विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीची लांबी १३७२ मीटर असून, ती १८५० मीटर केली जाणार आहे. टर्मिनल इमारत उभारणे, अग्निशमन केंद्र, एटीसी टॉवर निर्मिती, अप्रन क्षमतेत वाढ, तीन एटीआर व एक एअर बस बोइंग, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, रस्ते चौपदरीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था आदी कामे होणार आहेत.

सन २०१८ अखेर बेलोरा विमानतळाहून विमाने धावणार असून, त्या अनुषंगाने शासनाने तयारी चालविली आहे. धावपट्टीच्या विस्तारासह अन्य विकासकामांच्या निविदा लवकरच काढल्या जातील. विमानतळाचे उर्वरित ६० कोटींचा निधी वितरित केला जाईल.
- प्रवीण पोटे
पालकमंत्री, अमरावती.

मध्यंतरी बेलोरा विमानतळासंदर्भात ना. मदन येरावार यांच्याकडून पत्र प्राप्त झाले होते. सध्या विमानतळाचे विकासकामाची काय स्थिती आहे, याबाबत मंत्रालयातून जाणून घेतले जाईल. विमानसेवा सुरू करणे गरजेचे आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच अवगत केले आहे.
- सुनील देशमुख
आमदार, अमरावती.

Web Title: When did Bellora Airport design, planning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.