निम्न दर्जाची मिठाई तयार करणाऱ्यांवर कारवाई केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 09:59 PM2018-09-16T21:59:11+5:302018-09-16T21:59:25+5:30
निम्न दर्जाची व घातक रासायनिक रंगाच्या वापरातून तयार होणाऱ्या मिठाईचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायला हवे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निम्न दर्जाच्या मिठाईची विक्री होत असताना अन्न प्रशासन विभाग गप्प का, असा प्रश्नही पुढे येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निम्न दर्जाची व घातक रासायनिक रंगाच्या वापरातून तयार होणाऱ्या मिठाईचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायला हवे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निम्न दर्जाच्या मिठाईची विक्री होत असताना अन्न प्रशासन विभाग गप्प का, असा प्रश्नही पुढे येत आहे. घातक रंगमिश्रीत मिठाईची विक्री करणाऱ्यांवर अन्न प्रशासन विभाग केव्हा कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
गणेशोत्सवात दररोज अंदाजे १५ हजारो किलो मिठाईची विक्री होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण मिठाई तयार करण्यासाठी लागणारा खवा अन्य जिल्ह्यातून मागविला जातो. हा खवा योग्य की अयोग्य? हे कोठेही तपासले जात नाही. असे असताना मिठाईसाठी हा खवा जिल्हाभरात नामांकित प्रतिष्ठानांना पुरविता जातो. अमरावती जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त मिठाई विके्रते आहेत. गतवर्षीसुध्दा अन्न प्रशासन विभागाने मिठाई विक्रेत्यांच्या प्रतिष्ठांनाच्या झडत्या घेऊन नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यावर्षीसुद्धा एफडीएकडून धडाकेबाज कारवाईची अपेक्षा आहे. त्यापार्श्वभूमिवर कारवार्इंचा बडगा उगारायला हवा. निम्न दर्जाची मिठाई व रसायनमिश्रित रंगाची मिठाई जर नागरिकांच्या पोटात जात असेल तर नागरिकांना याची कल्पनाही नसेल की, अशा गोड विषामुळे कर्करोगासारख्या आजारालाही आंमत्रण मिळू शकते. नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.