अनधिकृत स्मोकिंग झोनवर कारवाई केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 10:57 PM2017-08-25T22:57:36+5:302017-08-25T22:58:03+5:30

चहाच्या टपºया व पाणटपºयांवर अनधिकृतपणे पार्किंग झोन तयार करून या ठिकाणी धुम्रपान केल्या जात आहे.

When to take action on unauthorized smoking zone? | अनधिकृत स्मोकिंग झोनवर कारवाई केव्हा ?

अनधिकृत स्मोकिंग झोनवर कारवाई केव्हा ?

Next
ठळक मुद्देनियमबाह्य : सार्वजनिक ठिकाणीही सर्रास धुम्रपान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चहाच्या टपºया व पाणटपºयांवर अनधिकृतपणे पार्किंग झोन तयार करून या ठिकाणी धुम्रपान केल्या जात आहे. या ठिकाणी अ‍ॅक्टीव स्मोकर्समुळे पॅसिव्ह स्मोकिंगच्या विळख्यात अंबानगरीतील तरूण जात आहे. यासाठी अधिकृत स्मोकिंग झोन तयार करण्यात आले आहे. या नियमबाह्य स्मोकिंग झोनवर कारवाई केव्हा असा प्रश्न केला जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी सुध्दा सर्रास स्मोकिंग केली जात आहे. बसस्थान, रेल्वेस्टेशन, सिनेमा थेटर्स, विविध महाविद्यालयाच्या समोर तसेच शासकीय कार्यालयाच्या समोर सुध्दा सर्रास रोज हजारो नागरिक स्मोकिंग करतात. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे हे नियमबाह्य असून याकडे पोलिसांचे व एफडीएचे व संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक ठिकाणी जर धुम्रपान करण्यात येत असेल तर कारवार्इंचा बडगा उगारला पाहिजे व अनाधिकृत धुम्रपान करणाºयांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. परंतु याकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. हॉटेल व पाणटपºयांवर अनाधिकृत स्मोकिंग झोन तयार करण्यात आल्याची वृत्त लोकमतने देऊन यासंदर्भाचे प्रश्न लोकदरबारात मांडला होता. पण यासंदर्भाची पोलिसांनी व अन्न व प्रशासन विभागाने कुठलीही कारवाई केली नाही.त्यामुळे या प्रशासन किती बेजबाबदार आहे. हे दिसून येत आहे. धुम्रपान केल्या जात असल्याने हजारो तरूणांचे आरोग्य खराब होत आहे. कर्करोगासारखे गंभीर आजार यातून होत आहेत. तसेच अ‍ॅक्टीव स्मोकर्समुळे इतरांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कुणी धुम्रपान करीत असेल व त्याच्या बाजुला अनेक लोक बसले असेल तर त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाच्यावतीने किंवा महापालिकीने कुठल्याही पाणटपरी किंवा चहाटपरीवाल्यांना अधिकृत स्मोकिंग झोनची परवानगी दिली नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी स्मोकिंग झोन आहेत ते नियमबाह्य आहे.

Web Title: When to take action on unauthorized smoking zone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.