‘ग्लायफोसेट’ तणनाशकाच्या वापरावर बंदी केव्हा? शेतकरी मिशनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 08:15 PM2018-05-03T20:15:03+5:302018-05-03T20:15:03+5:30

लगतच्या आंध्र प्रदेशमध्ये ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या   विक्रीवर सरकारने  बंदी घातल्यानंतर यवतमाळ येथील कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण विभागाला आरोग्यासह पर्यावरणाला घातक या तणनाशकावर बंदी घालण्याचे पत्र दिले आहे.

When to use glyphosate herbicide? Demand for Farmer's Mission | ‘ग्लायफोसेट’ तणनाशकाच्या वापरावर बंदी केव्हा? शेतकरी मिशनची मागणी

‘ग्लायफोसेट’ तणनाशकाच्या वापरावर बंदी केव्हा? शेतकरी मिशनची मागणी

Next

अमरावती - लगतच्या आंध्र प्रदेशमध्ये ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या   विक्रीवर सरकारने  बंदी घातल्यानंतर यवतमाळ येथील कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण विभागाला आरोग्यासह पर्यावरणाला घातक या तणनाशकावर बंदी घालण्याचे पत्र दिले आहे. या प्रस्तावावर गंभीरपूर्वक विचार करावा, अशी मागणी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाकडे केली.

‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या पाकिटावर केवळ चहाच्या लागवडीसाठी आणि बिनमहत्वाच्या जागेवर या तणनाशकाचा  वापर करण्याची परवानगी भारत सरकारच्या केंद्रिय कीटकनाशक मंडळाने दिल्याचे अंकित आहे. यवतमाळ जिल्ह्यात चहाची लागवड नसल्याने ग्लायफोसेटचा वापर करण्याची गरज नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले असल्याचे तिवारी यांनी सांगीतले. तेलंगणाच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधून ग्लायफोसेटचा शिरकाव यवतमाळ जिल्ह्यासह  विभागाात होऊ शकतो, असी भीती तिवारी यांनी व्यक्त केली.

एचटी बियाण्यांची चोरटी आवक सुरू
ग्लायफोसेट या तणनाशकाच्या अनियंत्रित वापरामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत आहेत. गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून एचटी बियाण्यांची चोरटी आवक सुरू झाली.  तणनाशकाच्या  विक्रीवर  बंदी टाकण्याचे अधिकार मध्यवर्ती कीटकनाशके बोर्ड (सीआयबी) यांच्याकडे असल्याने यावर बंदी घालणे तितकेसे सोपे नाही, असे तिवारी यांनी सांगितले.

Web Title: When to use glyphosate herbicide? Demand for Farmer's Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.