पतीराजांना आवर केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:18 PM2019-02-14T23:18:06+5:302019-02-14T23:18:43+5:30

शिवसेना नगरसेविकेच्या पतिराजाने सोमवारी केलेल्या प्रतापानंतर महिला सदस्यांचे पती व कुटुंबीयांद्वारे महापालिका कामकाजात होत असलेला हस्तक्षेप चव्हाट्यावर आला. प्रशासनात किमान डझनभर पतिराजांची ढवळाढवळ होत असल्याची माहिती आता बाहेर आलेली आहे. ज्या मतदारांनी या महिला सदस्यांना निवडून दिले, त्यांचा हा एकप्रकारे अवमानच ठरत असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

When was the husband's husband? | पतीराजांना आवर केव्हा?

पतीराजांना आवर केव्हा?

Next
ठळक मुद्देनगरविकासच्या परिपत्रकाची अंमलबजावणी नाही : डझनभर व्यक्तींचा प्रशासनाच्या कामकाजात हस्तक्षेप

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिवसेना नगरसेविकेच्या पतिराजाने सोमवारी केलेल्या प्रतापानंतर महिला सदस्यांचे पती व कुटुंबीयांद्वारे महापालिका कामकाजात होत असलेला हस्तक्षेप चव्हाट्यावर आला. प्रशासनात किमान डझनभर पतिराजांची ढवळाढवळ होत असल्याची माहिती आता बाहेर आलेली आहे. ज्या मतदारांनी या महिला सदस्यांना निवडून दिले, त्यांचा हा एकप्रकारे अवमानच ठरत असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
महापालिकेत नगरसेवकांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभागाने १ नोव्हेंबर २०१२ व १६ आॅगस्ट २०१३ अन्वये आवश्यक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. याव्यतिरिक्त नगरविकास मंत्रालय उपसचिवांचे २० जुलै १९९३ व १९९५ मधील परिपत्रक आहे. मात्र, याचा सोयिस्कर विसर सदस्यांना पडला. नगरसेवकांव्यतिरिक्त त्यांचे पतीच नव्हे कार्यकर्तेही स्वत:च नगरसेवक असल्याच्या थाटात कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून कामे करून घेतात. ही महापालिकेच्या परिपत्रकाची प्रतारणा आहे.
महापालिकेत सोमवारी साईनगर प्रभागातील एका कामाच्या भूमिपूजनावरून श्रेयवाद उफाळून आला. आयुक्त आमचे ऐकून घेत नाहीत, भूमिपूजन करीत नाहीत, सांगितलेली कामे करीत नाहीत, राजकीय दबावात राहतात आदी आरोप करीत महिला नगरसेविकेच्या अनुपस्थितीत पतिराजांनी त्या प्रभागातील अन्य एका नगरसेवकाविरुद्ध नाराजी प्रकट केली. आयुक्तांवर दोषारोपण करून स्वत:च महापालिकेत कामाच्या बाबतीत हस्तक्षेप करणे, हा महापालिकेच्या परिपत्रकाच्या विरोधाभासातील प्रकार ठरला. यापुढेही जाऊन आयुक्तांच्या कक्षाला काळे फासण्याचा प्रकार केला.
महापालिका आयुक्तांसमक्ष खुद्द शिवसेना गटनेत्यांनी ही बाब निषेधार्ह असल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांनीही सवंग लोकप्रियतेसाठी हा प्रकार असल्याचे संबोधून निषेध केला व पोलिसांत तक्रार दाखल केली. महापालिका प्रशासनात ढवळाढवळ करण्याचा हा प्रकार जेवढा चर्र्चेत राहिला, त्यापेक्षा अधिक वादग्रस्त ठरलेला आहे. यापुढे नगरसेविकांच्या पतींना शासन परिपत्रकाद्वारे महापालिकेत आवर घालण्याचा पवित्रा आता आयुक्तांनी घेतला आहे.
शासनाचे २० जुलै १०९३ चे परिपत्रक
‘शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, नगरपालिकेच्या महिला सदस्यांचे पती/नातेवाईक हे सभेमध्ये उपस्थित राहतात, मुद्दे मांडतात, कामकाजात हस्तक्षेप करतात. असेही निदर्शनात आले आहे की, महिला सदस्यांचे पती/नातेवाईक कार्यालयांमध्ये जाऊन तेथील कामकाजात ढवळाढवळ करतात व कर्मचाºयांशी वाद घालतात. त्यांच्याशी वैयक्तिक संबंध नसलेल्या प्रकरणांमध्ये विशिष्ट पद्धतीने कार्यवाही व्हावी, अशी आग्रही भूमिका घेऊन वाद घालतात व अधिकारी/कर्मचाऱ्यांचा उपमर्द करतात, गैरवर्तणूक करतात. याची त्वरित दखल घेवून कार्यवाही करावी.’
हा तर मतदारांचा विश्वासघातच!
अमरावती महानगरपालिकेची एकूण सदस्यसंख्या ८७ आहे. त्यापैकी ४४ महिला सदस्य आहेत, तर पाच स्वीकृत सदस्यांपैकी एक महिला आहे. अशा एकूण ४५ महिला सदस्यांपैकी किमान १० ते १२ महिला सदस्यांचे पतिराज वा मुलांचा महापालिकेच्या कारभारात थेट हस्तक्षेप असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. मतदारांनी महिला सदस्यांना विश्वास ठेवून निवडून दिले आहे. त्यामुळे पतिराजांकडून कारभारात ढवळाढवळ हा त्या मतदारांचा विश्वासघात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
असे आहे महापालिकेचे परिपत्रक
यापूर्वी राहुल रंजन महिवाल प्रभारी आयुक्त व हेमंत पवार महापालिकेचे आयुक्त असताना नगरसचिव विभागाद्वारे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार महिला नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डातील कामासंदर्भात महापालिकेच्या सबंधित कर्मचाºयांना भेटून किंवा आवेदनाद्वारे मागणी सादर करावी. मात्र, असे निदर्शनात येत आहे की, आपल्यावतीने आपल्या कुटुंबातील व्यक्ती /कार्यकर्ता थेट महापालिका कर्मचाºयांना संपर्क करून त्यांच्यावर स्वत: महापालिकेचे सदस्य असल्याबाबतचा दबाव टाकून कामे करून घेतात. त्यांना आपले अधिकार वापरण्यापासून परावृत्त करावे, असे नमूद आहे.

महापालिकेच्या कारभारात पतिराजांना हस्तक्षेप करता येत नाही. याबाबतचे नगरविकास व महापालिकेचेदेखील परिपत्रक आहे. यापुढे हा प्रकार खपवून घेणार नाही, याविषयी कार्यवाही केली जाईल.
-संजय निपाणे
आयुक्त, महापालिका.

Web Title: When was the husband's husband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.