पाणीपुरवठा पूर्ववत केव्हा?
By admin | Published: April 4, 2017 12:24 AM2017-04-04T00:24:30+5:302017-04-04T00:24:30+5:30
यशोदानगर, फ्रेजरपुरा, प्रशांतनगर, किशोरनगर, जलारामनगर, किरणनगर-१, किरणनगर-२, मोतीनगर, डहाणेनगर ...
अन्यथा आंदोलन : मजीप्रा अभियंत्याला चेतन पवारांचे निवेदन
अमरावती : यशोदानगर, फ्रेजरपुरा, प्रशांतनगर, किशोरनगर, जलारामनगर, किरणनगर-१, किरणनगर-२, मोतीनगर, डहाणेनगर भागात अनेक दिवसांपासून अल्प पाणीपुरवठा होत आहे. कधीकधी नळसुद्धा येत नाही. पाणीपुरवठा नियमित करून पुरेसे पाणी सर्वांना मिळावे, याकरिता त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा बसप गटनेता चेतन पवार यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिला आहे.
यावेळी दीपक किसनराव होले, नयना होले, बेबी राऊत, माया कोहळे, कल्पना खोडे, अंजली भामत, रचना बिजोरे, वंदना बेंडे, पद्मा देशमुख, मंदा भटकर, श्रीमती विद्या अंबर्ते, श्रीमती विद्या तिखे, मृदुला भटकर, प्रिया चौधरी, श्रीमती बेबी निर्मळ, श्रीमती अरुणा गावंडे, वंदना कल्याणकर, अरुणा प्रशांत साकरकर, सुमन वडुरकर, सुमन बोपशेट्टी, ज्योती निस्ताने, कुंदा दिवलकर, ललिता तायडे, शीला हगवणे, सुनीता पवार, वनमाला गडलिंग, अनिता हरवाणी, हर्षदा दातेराव, शीतल सुतवणे, शुभदा मोहन संत, उषा वानखडे, रोहिनी देशपांडे, शुभांगी कासे, जयश्री निंभोरकर, गीता बाहेकर, छाया बाहेकर, जयश्री कदम, स्वाती गादणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बबलू शेखावतांचे निवेदन
जोग स्टेडियम-चपराशीपुरा भागातील पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील पाणीपुरवठा चार दिवसांत सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनपाचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी दिला आहे. मजीप्राला यापूर्वी त्यांनी दोनदा स्मरणपत्र दिले आहे.