मुलांच्या दप्तराचे ओझे हलके होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:37 AM2019-07-26T01:37:55+5:302019-07-26T01:38:26+5:30

शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या जड दप्तराबाबतच्या नियमावलीला शाळा व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तर वाढतच चालले आहे. हा महत्त्वाचा विषय शाळांचा शासकीय शिक्षण विभागाकडूनही गांभीर्याने घेतला जात नाही.

When will the burden of the Children's Office be relaxed? | मुलांच्या दप्तराचे ओझे हलके होणार कधी?

मुलांच्या दप्तराचे ओझे हलके होणार कधी?

Next
ठळक मुद्देपाठदुखी : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नियमावलीला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या जड दप्तराबाबतच्या नियमावलीला शाळा व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तर वाढतच चालले आहे. हा महत्त्वाचा विषय शाळांचा शासकीय शिक्षण विभागाकडूनही गांभीर्याने घेतला जात नाही. याउलट जाब कोणाला विचारायचा म्हणून पालकांनी मौनव्रत स्वीकारले आहे.
फुलपाखरासारखे बागडायचे वय असलेल्या शाळकरी मुलांचे दप्तर त्यांच्या वजनाइतके होत असल्याच्या मुद्द्यावर मागील अनेक वर्षांपासून देशभर तक्रारींचा पाऊस सुरू होता. याबाबत अनेक आंदोलनेही झाली. दप्तराच्या त्यामुळे मुलांना पाठीचे विकार होत असल्याचे समोर आले. शारीरिक वाढीत हे वजन अडसर ठरत असल्याच्या चर्चाही झडल्या. या सर्व बाजूंचा विचार करून अखेर केंद्र शासनाने निर्णायक भूमिका घेतली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबत नियमावली तयार करून सर्व राज्यांना अंमलबजावणीचे आदेश दिल. शिक्षण संस्थांनी या नियमावलीचे पालन करावे, अशा सूचनाही जारी करण्यात आल्या. प्रत्यक्षात या आदेशाचे आणि नियमावलीचे खोबरे झाल्याचा प्रकार दिसत आहे.
दप्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढतच आहे. लहान वयात मुलांची बौद्धिक व शारीरिक अशी परिपूर्ण वाढ योग्य गतीने होणे अपेक्षित असते. त्यामुळे त्यांच्या कोवळ्या पाठीवर अवजड वस्तूंप्रमाणेच दप्तर देणेही घातक आहे. सरकारी शाळांपासून ते अव्वाच्या सव्वा फी आकारणाऱ्या बहुतांश शाळा गुण वाढवण्याच्या स्पर्धने ईरेला पेटल्या आहेत. या स्पर्धेचा परिणाम म्हणजे, सर्व विषयांची पुस्तके आणि वह्या, वॉटर बॅग, नॅपकिन आदी साहित्य तसेच कंपास आणि स्पोर्ट्सचा तास असल्यास तो ड्रेस आणि वेगळा शूज अशी अतिरिक्त वजने विद्यार्थ्यांवर लादली आहेत. याचा परिणाम मात्र विद्यार्थ्यांवर होतो. विद्यार्थ्यांचे अशा दप्तर यामुळे पाठीबरोबरच पायावर भार पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या दुखण्यावर वाढ झाली आहे

Web Title: When will the burden of the Children's Office be relaxed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.