जिल्हाधिकारी कार्यालयाला केव्हा लागणार शिस्त ?

By Admin | Published: May 20, 2017 12:45 AM2017-05-20T00:45:02+5:302017-05-20T00:45:02+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाला शिस्त केव्हा लागणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

When will the district administration be disciplined? | जिल्हाधिकारी कार्यालयाला केव्हा लागणार शिस्त ?

जिल्हाधिकारी कार्यालयाला केव्हा लागणार शिस्त ?

googlenewsNext

वाहतूक विभागाला पत्र : आरडीसींनी मागितली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयाला शिस्त केव्हा लागणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ज्या ठिकाणी नो-पार्किंगचे फलक लावण्यात आले आहे, तेथे शुक्रवारीसुद्धा अवैधरीत्या वाहनांची पार्किंग करण्यात आली होती.
आरडीसींनी नाझर विभागाला जरी माहिती मागविली आहे, तरीही जे नो-पार्किंगस्थळी अवैधरीत्या वाहने लावत आहे त्याचे काय? आरडीसींनी वाहतूक पोलीस विभागाला कारवार्इंचे पत्र द्यावे व कारवाईसंदर्भात सूचना करावी. कारवार्इंचे आदेश देण्यास ते इतका विलंब का करीत आहेत, हा प्रश्न आता पुढे येत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून नियमांचे उल्लघंन करून बेशिस्त वाहने लावणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांचा अभय का? त्यांनाच बेशिस्तपणा हवा आहे का? हा प्रश्नही आता चर्चिला जात आहे. गुरूवारी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी नाझर विभागाला परिसरातील अधिकृत पार्किंगच्या जागे कुुठलीकुठली आहे. यासंदर्भातील माहिती मागविली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील बेशिस्त पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न कायम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्या प्रवेशव्दाराच्या समोर असलेल्या नो- पार्किंग फलक ज्या ठिकाणी लावण्यात आले आहे. तेथे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवार्इंचा बडगा उगारल्यास बेशिस्त पार्किंग व्यवस्थेला कायमचाच आळा बसणार आहे.

 

Web Title: When will the district administration be disciplined?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.