१२ रेल्वेस्थानकावरील ग्रहन कधी सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:37+5:302021-09-02T04:26:37+5:30

पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने ग्रामीण भागातील स्थानकही बंदच : प्रवाशांचे हाल, अधिकचा भुर्दंड अमरावती : कोरोनाच्या आगमणानंतर मागील ...

When will the eclipse at 12 railway stations be released? | १२ रेल्वेस्थानकावरील ग्रहन कधी सुटणार?

१२ रेल्वेस्थानकावरील ग्रहन कधी सुटणार?

Next

पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने ग्रामीण भागातील स्थानकही बंदच : प्रवाशांचे हाल, अधिकचा भुर्दंड

अमरावती : कोरोनाच्या आगमणानंतर मागील वर्षीपासून रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. पहिल्या लाटेत सुरुवातीला पॅसेंजरसह एक्सप्रेस गाड्याही बंद होत्या. त्यानंतर कोरोना लाट ओसरल्यावर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू झालेल्या नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १२ रेल्वे स्थानक बंदच आहेत. येथे केवळ रेल्वे कर्मचारीच दिसून येतात. या पॅसेंजर गाड्या बंद असल्याने सर्व सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. जिल्ह्यातून नागपूर- मुंबई तसेच नागपूर-चैन्नई येथे दोन रेल्वे मार्ग जातात. या मार्गावर सद्या विशेष रेल्वे गाड्याच धावत आहे.

बॉक्स

बंद असलेल्या पॅसेजर रेल्वे

-भुसावळ-नागपूर

-नागपूर-भुसावळ

-नागपूर-अमरावती

-अमरावती- भुसावळ

- अमरावती- नागपूर इंटरसिटी

- वर्धा- भुसावळ

बॉक्स

बंद असलेली रेल्वे स्थानक

- टाकळी

- शिराळा

- मालखेड

- चांदूर बाजार

-वलगाव

- पुसला

- वरूड

- बनोडा

-हिवरखेड

- मोर्शी

- नवी अमरावती

- टाकळी

कोट

एक्सप्रेस सुरू मग पॅसेंजर बंद का?

गेल्या दीड वर्षापासून पॅसेजर गाड्या बंद आहेत. या गाड्या ग्रामीण भागातील स्थानकावर थांबत होत्या. यातून शहरात दुध, भाजीपाला आणणेही सोईचे होते. विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होत होता. मात्र कोरोनानंतर या गाड्या सुरू झालेल्या नाही. अनेकदा निवेदनही देण्यात आले. परंतू अजूनही पॅसेजर सुरू झालेल्या नाही.

- राजेश सपकाळे, प्रवासी

Web Title: When will the eclipse at 12 railway stations be released?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.