गारपीटग्रस्तांना कधी मिळणार मदत?

By admin | Published: March 3, 2016 12:30 AM2016-03-03T00:30:48+5:302016-03-03T00:30:48+5:30

सोमवारी तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकरी पुन्हा हादरला असून या शेतकऱ्यांना मदतीचा हात कधी मिळणार, ...

When will help hailstorm victims? | गारपीटग्रस्तांना कधी मिळणार मदत?

गारपीटग्रस्तांना कधी मिळणार मदत?

Next

वीरेंद्र जगताप यांचा सवाल : शेतकऱ्यांच्या जाणल्या व्यथा
धामणगाव रेल्वे : सोमवारी तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकरी पुन्हा हादरला असून या शेतकऱ्यांना मदतीचा हात कधी मिळणार, असा सवाल आ़वीरेंद्र जगताप यांनी केला. त्यांनी २२ गावांचा दौरा करुन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
गारपिटीने सर्वाधिक हानी अंजनसिंगी, ढाकुलगाव, अशोकनगर, गुंजी, तरोडा, गंगाजळी, दाभाडा, कावली, विरूळ रोंघे,वाठोडा, मंगरूळ दस्तगिर, वसाड, चिंचपूर, झाडगाव, पेठ रघुनाथपूर, आष्टा, चिंचोली, झाडगाव, निंबोरा बोडका, तळणी, कासारखेड, निंबोली, अशोकनगर, गव्हा फरकाडे, जळगाव निंभोरा बोडका, हिंगणगाव, निंभोरा राज, विटाळा या भागात झाली आहे़ हातात येणारे पीक गेले तर भाजीपाला, टरबूज, संत्रा, मोसंबी, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे़
आ़ वीरेंद्र जगताप यांनी संबधित गावांचा दौरा करून गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या. शेतकऱ्यांनी डोळ्यांत पाणी आणून आपबिती त्यांच्यासमोर मांडली. केंद्रातील व राज्यातील सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. पोषिंद्याकडेच शासनाने दुर्लक्ष केल्याची नाराजी आ़जगताप यांनी व्यक्त करून आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असून उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला़
यावेळी त्यांच्यासोबत जि़प़ अध्यक्ष सतीश उईके, जि़प़ सदस्य मोहन सिंघवी, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार श्रीकांत घुगे, बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत गावंडे, प़ंस़ सदस्या सविता इंगळे, संगीता निमकर, माजी पं़स़ सदस्य रवि भुतडा, अविनाश इंगळे यांच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते़

काँग्रेस आक्रमक
तालुक्याला दरवर्षी वादळी पावसाचा फटका बसतो. यंदा तालुक्यात गारपीट व वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे़ झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अन्यथा काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत देशमुख, माजी प़ंस़ सदस्य पंकज वानखडे, सुरेश रामगुंडे, अतुल वाघ यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे़

Web Title: When will help hailstorm victims?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.