अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई मिळणार केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:19+5:302021-04-15T04:12:19+5:30
फोटो - चांदूर बाजार १४ एस २०१९-२० मध्ये पिकांना फटका, भारतीय जनता युवा मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदनचांदूर बाजार :- ...
फोटो - चांदूर बाजार १४ एस
२०१९-२० मध्ये पिकांना फटका, भारतीय जनता युवा मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदनचांदूर बाजार :- २०१९-२० मध्ये ब्राम्हणवाडा थडी मंडळात पिकांना झालेल्या गारपिटीच्या नुकसानभरपाईचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे तहसिलदारांना निवेदनात करण्यात आली.
२०१९-२० या वर्षात ब्राह्मणवाडा थडी मंडळात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. त्याचे भरपाई अनुदान चांदुर बाजर तालुक्यातील इतर गावांना मिळाले, तर ब्राम्हणवाडा थडी, ईनापूर, विठ्ठलापूर, गौरखेडा शिवारातील शेतकरी वंचित राहिले. या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, भाजयुमो जिल्हा सचिव प्रणित खवले, महिला अध्यक्ष जयश्री पंडागरे, आशिष औतकर, प्रदीप पंडागरे, संजू पकडे, अरविंद मासोदकर, सागर शिरभाते, सुनील कपले, कैलाश कपले, लखन खडके, किशोर माहोरे, शुश्रुत सोनार आदी उपस्थित होते.